सरकार मानसिक त्रास देतंय : आ. प्रणिती शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 02:40 PM2019-09-16T14:40:40+5:302019-09-16T14:48:13+5:30

न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापुरातील सदर बझार पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी प्रणिती शिंदे दाखल 

Government is causing mental distress: a. Praniti Shinde | सरकार मानसिक त्रास देतंय : आ. प्रणिती शिंदे

सरकार मानसिक त्रास देतंय : आ. प्रणिती शिंदे

Next
ठळक मुद्दे- न्यायालयाच्या आदेशानुसार प्रणिती शिंदे हजेरी लावण्यासाठी सदर बझार पोलीस ठाण्यात- पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना धक्काबुक्की करून पोलीसांना जखमी केल्याचा आ. प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा 

सोलापूर : जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवणाºया लोकप्रतिनिधींचा सरकारकडून आवाज दाबला जात आहे. त्याचप्रमाणे आपल्याला मेंटली टॉर्चर  केलं जात आहे, असा आरोप सोलापुरातील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसात हजेरी लावल्यानंतर प्रणिती यांनी भाजप सरकारवर ताशेरे ओढले. कितीही गुन्हे नोंदवले गेले, तरी गोरगरीबांसाठी मी लढा देतच राहणार. सत्ताधाºयांकडून देशभरात दबाव येत आहे. आमच्यावर मेंटल टॉर्चर केलं जातं. मात्र आम्ही त्याला न जुमानता लढा देणार. कायद्याच्या चौकटीत राहून लढा देणार, अशी प्रतिक्रिया प्रणिती शिंदे पत्रकारांशी बोलताना दिली.

पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना करण्यात आलेल्या धक्काबुक्की प्रकरणी आमदार प्रणिती शिंदे आज सोलापुरातील सदर बझार पोलीस ठाण्यात हजर झाल्या. याप्रकरणी सरकार मुद्दामहून मानसिक त्रास देत असल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी यावेळी केला. सरकार जाणून बूजून त्रास देत असले तरी आम्ही न्यायालयाचा मान राखत आहोत. सामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा लढा सुरुच ठेवणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जिल्हा नियोजन बैठकीच्या वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. धक्काबुक्की करून पोलिसांना जखमी केल्याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी न्यायालयाने आ़ प्रणिती शिंदे याना जामीन मंजूर केला असून प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात त्यांनी हजेरी लावली, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जिल्हा नियोजन समितीची २ जानेवारी २०१८ रोजी बैठक होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जात असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी औषधोपचारावर झालेली दरवाढ रद्द करा, अशी घोषणाबाजी करीत गाडी अडवून घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांबरोबर कार्यकर्त्यांनी हमरीतुमरी करून ढकलाढकली केली. यात पोलीस कर्मचारी खाली पडून जखमी झाला. या प्रकरणी आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्यासह आंदोलकांवर सदर बझार पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.

Web Title: Government is causing mental distress: a. Praniti Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.