गुड न्युज ; सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 16:32 IST2018-07-23T16:30:14+5:302018-07-23T16:32:03+5:30

मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश

Good news; Solapur-Tuljapur-Osmanabad new railway track proposal approved | गुड न्युज ; सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मंजूर

गुड न्युज ; सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मंजूर

ठळक मुद्दे८० किलोमीटर रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी 953 कोटींचा खर्च अपेक्षितसोलापूर जिल्ह्याच्या व विकासाला चालना मिळणारया महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले

सोलापूर : राज्यातील सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन रेल्वे मागार्चा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला असून या मागार्मुळे उस्मानाबाद-सोलापूरच्या व विकासास चालना मिळण्यासोबतच तुळजापूर येथे भेट देणाºया भाविकांची मोठी सोय होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागार्बाबत सातत्याने पाठपुरावा केला होता.

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे त्यांनी विशेष आभार मानले आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या यंदाच्या म्हणजे २०१८-१९ च्या योजनात नव्या रेल्वेमागार्चा समावेश करण्यात आला आहे.

सोलापूरहून तुळजापूरमार्गे उस्मानाबादला जाणाºया  ८० किलोमीटर रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी 953 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मागार्मुळे देशातील उस्मानाबादसारख्या आकांक्षी जिल्ह्यासोबतच सोलापूर जिल्ह्याच्या व विकासाला चालना मिळणार आहे. तसेच, महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणाºया तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जाणाºया भाविकांचीही मोठी सोय होणार आहे.

Web Title: Good news; Solapur-Tuljapur-Osmanabad new railway track proposal approved