Good News; शुक्रवारपासून सोलापूर-मुंबई सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस धावणार
By Appasaheb.patil | Updated: October 7, 2020 13:16 IST2020-10-07T13:09:22+5:302020-10-07T13:16:09+5:30
solapur - Mumbai railway news; सोलापूर लोकमत ब्रेकींग

Good News; शुक्रवारपासून सोलापूर-मुंबई सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस धावणार
सोलापूर : सोलापूरकरांच्या लाईफ लाइन समजली जाणारी गाडी क्रमांक ०२११५/०२११६ सोलापूर-मुंबई सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस शुक्रवार ९ आॅक्टोबरपासून धावणार आहे़ याबाबतची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
मागील सहा महिन्यांपासून कोविड-१९ (साथीचा रोग) सर्व देशभर कोरोना (साथीचा रोग) साथीच्या आजारामुळे देशाभरात यात्री सेवा बंद करण्यात आली आहे. यानंतर विशेष यात्री एक्सप्रेस गाड्या देशभरात धावू लागल्या आहेत. रेल्वेची परिस्थिती पुर्वपदावर येत आहे. सोलापुरच्या नागरिकासाठी ९ आॅक्टोबरपासून गाडी क्र. ०२११५/०२११६ सोलापुर-मुंबई-सोलापुर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस धावणार आहे.
सदर गाडी विशेष एक्सप्रेसच्या वेळेवर धावेल आणि स्थानकावरील हॉल्ट सुध्दा त्याच प्रमाणे असतील, परंतु कर्जत, खंडाळा, लोनावळा, माढा, मोहोळ आणि भिगवण स्थानकावरील ही एक्सप्रेस थांबणार नाही. गाडी क्रमांक ०२११५ छ्त्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनल (मुंबई) ते सोलापुर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस ९ आॅक्टोबरपासून सीएसएमटी (मुंबई) स्थानकावरून धावणार आहे. गाडी क्रमांक ०२११६ सोलापुर ते छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनल (मुंबई ) सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस ९ आॅक्टोबरपासून सोलापूर स्थानकावरून धावणार आहे.