GOOD NEWS; UPSC परीक्षेस बसणाºया उमेदवारांसाठी सात विशेष रेल्वे गाड्या

By appasaheb.patil | Published: September 5, 2020 12:13 PM2020-09-05T12:13:43+5:302020-09-05T12:15:00+5:30

रविवारी होणार परीक्षा; राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नेव्हल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

GOOD NEWS; Seven special trains for UPSC candidates | GOOD NEWS; UPSC परीक्षेस बसणाºया उमेदवारांसाठी सात विशेष रेल्वे गाड्या

GOOD NEWS; UPSC परीक्षेस बसणाºया उमेदवारांसाठी सात विशेष रेल्वे गाड्या

Next
ठळक मुद्देभारतीय नौदल अकादमी कोर्ससाठी सामायिक परीक्षा ६ सप्टेंबर रोजी घेण्यात येणारया परीक्षेच्या माध्यमातून एकूण ४१३ पदांची भरती होणार आहे१९ एप्रिल २०२० रोजी घेण्यात येणारी परीक्षा कोरोना विषाणूजन्य महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती

सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवार ६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि नेव्हल अकॅडमी (एनए) ची सामायिक परीक्षा होणार आहे़ या परीक्षेला बसणाºया विद्यार्थ्यांसाठी रेल्वे मंत्रालयाने सात विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली.

एनडीएच्या १४६ व्या कोर्ससाठी सैन्य, नौदल आणि वायुदलातील प्रवेश आणि २ जुलै २०२१ पासून सुरू होणाºया १०८ व्या भारतीय नौदल अकादमी कोर्ससाठी सामायिक परीक्षा ६ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. यावर्षी ही एकच परीक्षा राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी (एनडीए) आणि नेव्हल अकॅडमी (एनए) मधील उमेदवारांच्या निवडीसाठी घेण्यात येणार आहे.

या परीक्षेच्या माध्यमातून एकूण ४१३ पदांची भरती होणार आहे. १९ एप्रिल २०२० रोजी घेण्यात येणारी परीक्षा कोरोना विषाणूजन्य महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती़ केंद्रीय लोकसेवा आयोगाने नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) आणि नेव्हल अकॅडमी (एनए)च्या  ६ सप्टेंबर रोजी होणाºया परीक्षांची प्रवेशपत्रे आॅनलाइन जाहीर केली आहेत. ही परीक्षा देशातील विविध केंद्रांवर होणार आहे़ रेल्वेने सोय केलेल्या विशेष रेल्वे गाड्या या ५ सप्टेंबर रोजी रात्री निघणार आहेत तर ६ सप्टेंबर रोजी मूळ स्थानकावरून परतीच्या मार्गावर धावणार असल्याचेही रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले़ 

या आहेत विशेष गाड्या....

  • - गाडी क्रमांक ०२१५४/०२१५३ सोलापूर-मुंबई-सोलापूर एक्सप्रेस 
  • - गाडी क्रमांक ०११५५/०११५६ पुणे-हैद्राबाद-पुणे एक्सप्रेस 
  • - गाडी क्रमांक ०११३२/०११३१ अहमदनगर-मुंबई अहमदनगर एक्सप्रेस
  • - गाडी क्रमांक ०११३७/०११३८ कोल्हापूर-नागपूर -कोल्हापूर एक्सप्रेस
  • - गाडी क्रमांक ०२१५९/०२१६० पुणे-नागपूर-पुणे एक्सप्रेस
  • - गाडी क्रमांक ०२१६७/०२१६८ अहमदनगर-नागपूर-अहमदनगर एक्सप्रेस
  • - गाडी क्रमांक ०११५७/०११५८ लोकमान्य टिळक टर्मिनस-हैद्राबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस

Web Title: GOOD NEWS; Seven special trains for UPSC candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.