Good News; Now everyone will get five kilos of free rice | Good News; आता प्रत्येकाला मिळणार पाच किलो मोफत तांदूळ

Good News; आता प्रत्येकाला मिळणार पाच किलो मोफत तांदूळ

ठळक मुद्देजीवनावश्‍यक वस्तूंची साठेबाजी केल्यास होणार कारवाईसर्वांना धान्य पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्जजिल्ह्यातील प्रत्येक रेशन दुकानावर असणारा जिल्हा प्रशासनाचा वॉच

सोलापूर : रेशन दुकानात दररोज नागरिक येऊन विचारत आहेत मोफत धान्य कधी मिळणार...  आता ही प्रतीक्षा संपली.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून 10 एप्रिलपासून रेशन दुकानात प्रत्येकी पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.


सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे २६ लाख ५ हजार ९३५ इतकी आहे.या लाभार्थ्यांना १८७२ स्वस्त धान्य दुकानांद्वारे धान्य वाटप करण्यात आले. यात बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेअंतर्गत २ रुपये किलो दराने प्रती कार्ड १५ किलो गहू आणि ३ रुपये किलो दराने प्रती कार्ड २० किलो तांदूळ दिला जातो.त्याचप्रमाणे २० रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते. तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना २ रु किलो दराने प्रती व्यक्ती ३ किलो गहू आणि ३ रु किलो दराने प्रती व्यक्ती २ किलो तांदूळ दिला जातो.


सोलापूर जिल्ह्यात या योजनेमधून सुमारे 3 हजार 216 मेट्रिक टन गहू, 2 हजार 66  मेट्रिक टन तांदुळ, तर १९ टन मेट्रिक टन साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे  ३हजार ६४९ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत आॅनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
तांदूळ मोफत देणार
 प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महीने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशन कार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५ किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशन कार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रती व्यक्ती ५ किलो तांदुळ दि १० एप्रिल पासून कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेकरिता तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगम पुणे कडून प्राप्त करून घेतले जातआहे.
जादा दर लावल्यास कारवाई
 जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकानांमधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे.मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक  ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग,वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.

Web Title: Good News; Now everyone will get five kilos of free rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.