शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Good News; हुतात्मा इंटरसिटी झाली आता २२ डब्यांची

By appasaheb.patil | Updated: April 22, 2019 10:22 IST

पुणेरी सोलापूरकरांना दिलासा; वाढलेल्या डब्यांमुळे तिकीट कन्फर्मची कटकट मिटली

ठळक मुद्देहुतात्मा एक्सपे्रस आता २२ डब्यांची झाली आहे. यात एसी २, सेकंड क्लास १३, जनरल डबे ६, एक साधा डबा असे २२ डबे असणार आहेत.मध्य रेल्वे सोलापूर विभागात असलेल्या कुर्डूवाडी सेक्शनमध्ये नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : सोलापूरला पुण्याशी जोडणारी हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२१५८/१२१५७) ही आता २२ डब्यांची झाली आहे़ या वाढलेल्या डब्यांमुळे नियमित सोलापूर-पुणे व पुणे ते सोलापूर प्रवास करणाºया हजारो प्रवाशांना मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलाने सुवार्ता दिली आहे.

मध्य रेल्वे सोलापूर विभागात असलेल्या कुर्डूवाडी सेक्शनमध्ये नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे़ तत्पूर्वी या ब्लॉक कालावधीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता सोलापूर विभागाने मध्य रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयास एंटरसिटी एक्सप्रेसला चार डबे वाढवावेत याबाबतचा अहवाल पाठविला होता़ त्यानुसार या अहवालाची दखल घेत वरिष्ठ कार्यालयाने चार डबे वाढविण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखविला़ त्यानुसार शनिवारी २० एप्रिलपासून एंटरसिटी एक्सप्रेसला चार डबे वाढविण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर मंडलातील वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिराडे यांनी दिली.

जनरल डब्यांमध्ये वाढ 

हुतात्मा एक्सपे्रस आता २२ डब्यांची झाली आहे. यात एसी २, सेकंड क्लास १३, जनरल डबे ६, एक साधा डबा असे २२ डबे असणार आहेत.

इंटरसिटीचा आजपर्यंतचा प्रवासप्रवाशांची मागणी लक्षात घेता मध्य रेल्वे विभागाने १५ जुलै २००१ साली सोलापूर मंडलातून सोलापूर ते पुणे या मार्गावर हुतात्मा इंटरसिटी एक्सप्रेस या नावाची गाडी सुरू केली़ सुरूवातीला १२ डबे असलेल्या एक्सप्रेसला १ जुलै २००७ रोजी एक, १५ आॅगस्ट २००८ साली एक, १ आॅगस्ट २०१६ रोजी दोन, ३१ जुलै २०१७ साली २ तर २० एप्रिल २०१९ पासून ४ डबे वाढविण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे १२ डब्यांची हुतात्मा आता २२ डब्यांची झाली आहे.

हुतात्मा एक्सप्रेसच्या डब्यांत वाढ करण्यात आली आहे. ही गाडी आता २२ डब्यांची झाली आहे. वाढीव जनरल डब्यांमुळे नियमित सोलापूर ते पुणे प्रवास करणाºया सर्वसामान्य नागरिक, नोकरदारांना चांगला दिलासा मिळणार आहे. या वाढीव डब्यांचा प्रवाशांनी लाभ घेऊन सुरक्षित प्रवास करावा.- हितेंद्र मल्होत्रा, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेblock development officerगटविकास अधिकारी