पोलिसांसाठी खुश खबर ! ताण होणार कमी, जिल्ह्यात आणखी चार पोलीस ठाण्यांची होणार वाढ
By रूपेश हेळवे | Updated: August 5, 2023 16:52 IST2023-08-05T16:51:53+5:302023-08-05T16:52:13+5:30
अहवाल आपण पाठवणार असल्याचे मत राज्याचे अपर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.

पोलिसांसाठी खुश खबर ! ताण होणार कमी, जिल्ह्यात आणखी चार पोलीस ठाण्यांची होणार वाढ
सोलापूर : जिल्ह्यातील जे तालुके मोठे आहेत, अशा जिल्ह्यातील चार ठिकाणी पोलीस ठाणे वाढवण्याची गरज आहे, याबाबतचा अहवाल आपण पाठवणार असल्याचे मत राज्याचे अपर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.
ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी अपर पोलीस महासंचालक प्रकाश हे तीन दिवसांपासून सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मत व्यक्त केले. यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कृष्ण प्रकाश पुढे म्हणाले, जिल्ह्यातील क्राइम रिकव्हरी प्रमाण जास्त आहे. तसेच काही भाग सोडल्यास जिल्ह्यात सर्वत्र शांतता आहे. यात अक्कलकोट येथे नेहमी छोट्या- मोठ्या घटना घडत असतात. तसेच दुसऱ्या राज्याच्या तुलनेत आपल्या राज्यात पोलिसिंग चांगले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.