माेठी बातमी; उद्यापासून सोलापुरातील सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 19:57 IST2021-04-05T19:57:37+5:302021-04-05T19:57:40+5:30

फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार

Good news; All shops in Solapur will be closed from tomorrow till April 30 | माेठी बातमी; उद्यापासून सोलापुरातील सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद

माेठी बातमी; उद्यापासून सोलापुरातील सर्व दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद

सोेलापूर - कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सोलापूर शहरात सोमवार ते शुुक्रवार सकाळी ७ ते ८ या काळात अत्यावश्यक सेवा असलेली दुकाने, कार्यालये सुरू असतील. बाकी सर्व बंद असेल. शुक्रवारी संध्याकाळी ७ ते सोमवारी सकाळी ८  या काळात संचारबंदी असेल. सोमवार ते शुुक्रवारपर्यंत अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू असणार आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी याबाबतचे आदेश दिले. बांधकाम, मालवाहतूक, कृषी संबंधित वाहतूक सुरू ठेवता येणार आहे.

दरम्यान, बेकरी, दुध डेअरी, भाजीपाला, किराणा दुकान, खाद्यपदार्थांची दुकाने, मेडिकल स्टोअर हे सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. हाॅटेल किंवा खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. शुक्रवारी सायंकाळी आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत रूग्णालय, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा दुकानं बंद राहणार आहेत.

 

Web Title: Good news; All shops in Solapur will be closed from tomorrow till April 30