शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

सोनं पिकलं हो, पण विकत नाही... नफा सोडा, खर्च तर निघंल का? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 12:40 IST

कांदा उत्पादकांच्या व्यथा; बाजारपेठा बंद, लॉकडाउनचा फटका; भाव चांगला मिळण्याची आशा ठरली फोल

ठळक मुद्देशेतमालाची विक्री झाली नसल्याने शेतकºयांना पैशाची चणचण भासू लागली लॉक डाऊनचा सामना शेतकरी मोठ्या हिमतीने करत असला तरी आगामी खरीप हंगामाची चिंता भेडसावत आहे शेतीचे अर्थकारण बिघडून गेले आहे . येत्या खरीप हंगाम बिघडण्याची चित्र दिसत आहेत

अक्षय आखाडे

कोर्टी: गतवर्षीच्या कांद्याच्या तुलनेत यंदा अतिवृष्टी आणि करपा रोगानं रोपं टिकेनाशी झाली... मग काय अनेकांना दोन-तीन वेळा बियाणं विकत घ्यावं लागलं... काहींनी तर पाहुण्यांकडे शेतात कांदा बियाणे टाकून रोपं तयार केली. त्यातच अतिवृष्टीमुळं गुलाबी कांद्याला सरासरीपेक्षा अधिक उतारा मिळाला नाही. त्यामुळं यंदा उन्हाळी कांद्याला हमखास चांगला भाव मिळेल, अशी आशा धरून बसलेल्या शेतकºयांना कोरोना संसर्गामुळे ‘लॉकडाउन’ जाहीर झालं अन् बाजारपेठा बंद झाल्या. हजार रुपये खर्च करूनही हा कांदा विकावा कुठं? असा प्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे. नफा तर सोडाच, ओतलेला पैसा तरी निघेल का? अशी आर्जव बळीराजा करू लागला आहे.

सोलापूर जिल्ह्यात अनेक तालुक्यातील शेतकरी उसासारख्या पिकांच्या नादी न लागता नगदी उत्पन्न मिळणारं पीक म्हणून कांद्याकडे पाहतात. मात्र अलीकडे झालेली अतिवृष्टी आणि त्यापाठोपाठ कोरोनाच्या रूपाने आलेल्या महामारीमुळे पुरतं आर्थिक गणित कोलमडलं आहे. अतिवृष्टीत गुलाबी कांद्याचे उत्पादन सरासरीपेक्षा अधिक न निघाल्याने चांगला भाव मिळेल, या आशेवरच अनेकांनी उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात केला. 

कांदा पिकाला बियाण्यापासून खते, खुरपणी, काढणी, कापणी आणि वाहतूक असा खर्च येतो. तरीही यंदा मोठ्या प्रमाणात लागवड झाली. अडचणीच्या काळात निव्वळ आशेवर कांदा बियाणे घेतले व उन्हाळी कांद्याची लागवड केली. आता अनेकांच्या शेतात उन्हाळी कांदा तयार झाला आहे. काही ठिकाणी तर काढून ढीग पडला आहे. पण आता बाजारपेठाच बंद असल्यामुळे तो कुठे नेऊ विकायचा हा प्रश्न शेतकºयांपुढे ‘आ’ वासून उभा आहे.

दरवर्षी करमाळा तालुक्यातील बहुतांश भागात उन्हाळी कांदा केला जातो. यंदा देखील तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे क्षेत्र आहे. तालुक्यातील गुलाबी कांद्याने यंदा पुणे बाजारपेठेत चांगलाच भाव खाल्ला होता. उन्हाळी अथवा गावरान कांद्याला भाजीपाल्याबरोबर चांगली मागणी असते. आज उन्हाळी कांदा काढला. परंतु दरवर्षी सहज विक्री होणाºया कांद्याचा यंदा लॉकडाउनमुळे चांगलाच वांदा झाला आहे. पुणे, सोलापूर, वाशी, नगर, नाशिक येथील बाजारपेठेत कांद्याला चांगली मागणी असते. 

यंदा या बाजारपेठेबरोबरच ग्रामीण भागातील आठवडा बाजार सुद्धा बंद आहेत. संचारबंदीमुळे कांदा शेतातच पडून आहे. कोरोनामुळे हमाल नसल्याने मार्केट कमिटी यांचा लिलाव चालत नाही. मार्केट चालू झाले तरी गोण्या भरून आणा, असे आडमुठे धोरण मार्के टमधून सुरू केले. यामुळे गोण्या भरून गाडीत भरण्यापर्यंतचा खर्च परवडत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. मागच्या कांदा उत्पादनाचा विचार करता नफा तर सोडाच, पण झालेला खर्चदेखील निघेल की नाही, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहे.

एकूणच सर्वच दिशांनी शेतकºयांवर कोरोना संसर्गाचे सावट पसरले आहे. यातून लवकरात लवकर सुटका व्हावी, अशी प्रार्थना गावोगावचे शेतकरी करू लागले आहेत.

कोरोनानं बिघडवलं : शेतकºयांचं गणित- लोक डाऊन मुळे शेतकरी वगार्ला मोठी  समस्या निर्माण झाली आहे. शेतीचे अर्थकारण बिघडून गेले आहे . येत्या खरीप हंगाम बिघडण्याची चित्र दिसत आहेत. लॉक डाऊनचा सामना शेतकरी मोठ्या हिमतीने करत असला तरी आगामी खरीप हंगामाची चिंता भेडसावत आहे रब्बी पिके काढून झाली की शेतकरी खरीप पिकासाठी मशागतीवर लक्ष देतात. मशागत करून याच काळात शेतकरी खते, बी बियाणे शेती करण्यासाठी लागणारा खर्च याचे नियोजन करत असतो. मात्र कोरोना मुळे लॉक डाऊनचे संकट उभे राहिले आहे.

शेतकºयांचा स्वत: कांदा काढण्याकडे भर- अपुरे मनुष्यबळ असले तरी लॉकडाउनच्या काळात कोणत्याच शेतमालाची विक्री झाली नसल्याने शेतकºयांना पैशाची चणचण भासू लागली आहे. लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्याने मजुरीसाठी पैसे खर्च करण्याची ऐपत उरली नाही. म्हणूनच स्वत: घरच्या घरी कांदा काढणीवर शेतकरी भर देत आहेत. काही जण कांदा साठवणूक करून कोरोना गेल्यावर तरी दोन रुपये भाव जादा मिळेल, या आशेवर नजर ठेवून आहेत.

एक एकर कांदा केला. कोरोनामुळे कांद्याची काढणी लांबली आहे. काढलेला कांदा बाजारपेठ बंद असल्यामुळे विकायचा कुठे असा प्रश्न आहे. शेतमालाची विक्री होत नसल्यामुळे शेतकºयांचे आर्थिक गणित चुकत आहे.- भर्तरीनाथ अभंग, कांदा उत्पादक कोर्टी

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेतीFarmerशेतकरी