गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केले वडिलांचे चंद्रभागेत अस्थी विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 11:15 IST2020-07-23T11:09:29+5:302020-07-23T11:15:19+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केले वडिलांचे चंद्रभागेत अस्थी विसर्जन
पंढरपूर : गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी वडीलांच्या अस्थींचे विसर्जन चंद्रभागेत गुरुवारी केले आहे.
गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बापू कवळेकर यांचे वडील राघू कवळेकर ( वय ७५) यांचे नऊ दिवसापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. वडिलांच्या अस्थीविसर्जन करण्यासाठी व धार्मिक विधीसाठी चंद्रकांत कवळेकर पंढरपूर येथे गुरुवारी आले होते. ते श्री राधा गोविंद भक्तनिवास येथे थांबले होते. चंद्रभागेच्या वाळवंटात धार्मिक विधी उरकून नदीपात्रात अस्थी विसर्जन केले. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू बाबल कवळेकर हे आले होते़.