शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

माळशिरसमधून लाखाचा लीड दिलाय, संन्यास घेणार का ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 16:07 IST

भगवी वस्त्रं आणून देऊ का ? मोहिते-पाटील संजय शिंदेंना उद्देशून लगाविला टोला

ठळक मुद्देराजकीय टोलेबाजी, सर्वच तालुक्यांत लक्ष केंद्रित केल्याचा दावामाळशिरसमधून लाखाचा लीड मिळाला तर राजकीय संन्यास घेऊ, असे संजय शिंदे यांनी म्हटले होते.माढा लोकसभा मतदारसंघातील प्रचारावेळी जयसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्यातून रणजितसिंह निंबाळकर यांना एक लाखापेक्षा अधिकचे मताधिक्य देऊ, असे जाहीर केले होते

सोलापूर : माळशिरस तालुक्यातून भाजपला एक लाखाचं मताधिक्य मिळवून दिलंय. लाखाचा लीड दिला तर राजकारणातून संन्यास घेऊ, असे कुणीतरी म्हणाले होते. ही माणसे आता राजकीय संन्यास घेणार का? भगवी वस्त्रं आणून देऊ का, असा टोला शिवरत्न दूध उत्पादक सहकारी संघाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना लगावला. 

माढा लोकसभा मतदारसंघातील प्रचारावेळी जयसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरस तालुक्यातून रणजितसिंह निंबाळकर यांना एक लाखापेक्षा अधिकचे मताधिक्य देऊ, असे जाहीर केले होते. माळशिरसमधून लाखाचा लीड मिळाला तर राजकीय संन्यास घेऊ, असे संजय शिंदे यांनी म्हटले होते. माळशिरसमधून निंबाळकरांना लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले आहे.

मतमोजणी केंद्रात गुरुवारी धैर्यशील मोहिते-पाटील सहा विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी संकलित करीत होते. यादरम्यान ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, अकलूज, यशवंत नगर भागातील लोक यावेळी ऐकायला तयार नव्हते. आपल्या गटावर अन्याय होत असल्याची भावना त्यांनाही होती. त्यामुळे तर आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. प्रचारादरम्यान लोकांचा कल लक्षात आला होता. माळशिरस विधानसभा मतदारसंघातून एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळाले आहे तर माढा विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या गावांमधून निंबाळकरांना २० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य आहे. आता त्यांनी राजकीय संन्यास घ्यायला हवा. भगवी वस्त्रं आणून देऊ का?, असा सवालही त्यांनी केला. 

सगळेच पत्ते ओपन करणार नाही - धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, फलटण, माण, माळशिरस तालुक्यातून चांगले मताधिक्य मिळेल याचा अंदाज होताच. करमाळा तालुक्यातील राजकीय परिस्थितीवर मी लक्ष ठेवून होतो. विरोधी गटातील नाराज नेत्यांना आम्ही विश्वासात घेतले. त्यांनी आमच्या बाजूने आले नाही तरी चालेल, पण किमान शांत राहावे, अशी गळ घातली. खरोखरच ज्यांच्यावर अन्याय झाला होता त्यांनी आम्हाला साथ दिली. सगळेच पत्ते आता ओपन करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. माढा आणि सांगोल्यातील मतदानाची आकडेवारी तुमच्यासमोर आहे. या तालुक्यांनी विरोधी गटाला विशेष मताधिक्य दिलेले नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालmadha-pcमाढाVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील