मैत्रिणीचा फोटो नवऱ्याच्या खिशात सापडला; पतीसह सहा जणांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: September 16, 2022 19:57 IST2022-09-16T19:57:18+5:302022-09-16T19:57:25+5:30

पतीच्या खिशातील मैत्रिणीचा फोटो पत्नीला सापडला. यावरून पती-पत्नीमध्ये  वाद सूरू झाला.

Girlfriend's photo found in husband's pocket; Crime of domestic violence against six people including husband | मैत्रिणीचा फोटो नवऱ्याच्या खिशात सापडला; पतीसह सहा जणांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा

मैत्रिणीचा फोटो नवऱ्याच्या खिशात सापडला; पतीसह सहा जणांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा

सोलापूर : पतीच्या खिशातील मैत्रिणीचा फोटो पत्नीला सापडला. यावरून पती-पत्नीमध्ये  वाद सूरू झाला. शिवाय कुटुुंबियांनी माहेरून पैसे आणण्यासाठी छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत कोमल अजित माने ( वय २४, रा. उत्तर कसबा, बाळीवेस ) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी कोमल यांचे आरोपी पती अजित अशोक माने यांच्याशी २०१४ मध्ये विवाह झाला. विवाहानंतर सहा महिने पती व त्यांच्या कुटुंबीयांनी कोमल यांना चांगले नांदवले. एके दिवशी अजितच्या खिशामध्ये मुलीचा फोटो कोमल यांना आढळला. याबाबत विचारणा केली असता अजितने मैत्रिणीचा फोटो असल्याचे सांगितले.

या कारणावरून अजित हा कोमल यांना सतत मारहाण करू लागला. तसेच सासरच्या लोकांनी कोमल यांना घरात कोंडून ठेवून मारहाण करून मुलाला फिर्यादीकडे न देता माहेरी हाकलून दिले. याप्रकरणी आरोपी पती अजित माने, सासू सुनीता अशोक माने, सासरे अशोक पंढरीनाथ माने, लहान-दीर अर्जुन अशोक माने, आरती संदीप जाधव, समीक्षा स्वामी ( सर्व रा. केगाव ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Girlfriend's photo found in husband's pocket; Crime of domestic violence against six people including husband