शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
5
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
6
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
7
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
8
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
9
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
10
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
11
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
12
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
13
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
14
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
15
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
16
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
17
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
18
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
19
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
20
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

कर्ज थकविणाऱ्यांना चौदाशे कोटी दिले; प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्यांना लटकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:23 IST

गेल्या चार वर्षांत राज्यात दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली आहे. भाजपा सरकारने सन २०१७मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान ...

गेल्या चार वर्षांत राज्यात दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली आहे. भाजपा सरकारने सन २०१७मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेव्दारे दीड लाखापर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ केले, तर दीड लाखावरील कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक रकमी परतफेड योजना राबवली. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपये जमा केले. सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ४० हजार ९५२‍ शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ झाला होता.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, असे म्हणत सत्तेवर आलेल्या उद्धव ठाकरे यांनी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९मध्ये जाहीर केली. या सरकारने दोन लाखांपर्यंतच्या जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ६४८ कोटी ९८ कोटी रुपये बँकांना दिले आहेत. भाजपा व आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी जिल्ह्याला एकूण १,४७५ कोटी ५२ लाख रुपये दिले आहेत.

यामध्ये भाजपा सरकारच्या कालावधीतील दीड लाखांपर्यंतच्या संपूर्ण कर्ज माफीचे ५११ कोटी ६१ लाख, प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे १०६ कोटी ७० लाख तसेच ओटीएसचे २०८ कोटी २३ लाख रुपयांचा समावेश आहे. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी ५० हजार रुपये जमा करण्याची घोषणा आघाडी सरकारने दीड वर्षांपूर्वी केली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी मुर्हूत लागला नाही.

-----

जिल्हा बँकेचे सर्वाधिक लाभधारक

भाजपा व आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीचा जिल्ह्यातील दोन लाख १३ हजार ८२९ शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. यामध्ये केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एक लाख ३८ हजार ५१६ खातेदारांना तब्बल ८४९ कोटी २६ लाख रुपये मिळाले आहेत. इतर सर्व बँकांच्या ७५ हजार ३१३ शेतकऱ्यांना ६२६ कोटी २६ लाख रुपये मिळाले आहेत.

----

दीड लाखापर्यंतच्या ७३ हजार ४९८ शेतकऱ्यांना ५११ कोटी ६१ लाख, नियमित कर्ज भरणाऱ्या ४८ हजार ३९९ शेतकऱ्यांना १०६ कोटी ७० लाख, १९ हजार ५९ शेतकऱ्यांना २०८ कोटी २३ लाख असे ८२६ कोटी ५४ लाख, तर आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी ६४९ कोटी रुपये दिले आहेत.

---