Gautami Patil Dance | 'गौतमी'ला पाहून तरुणाईचा तोल गेला; सावरायला पोलिसांच्या काठ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2023 11:44 IST2023-04-07T11:42:57+5:302023-04-07T11:44:05+5:30
गौतमी पाटील ‘तुम्हा बघून तोल माझा गेला, तुम्ही सावरायला गप्पकन आला...’ या गाण्यावर डान्स करत असतानाच घडला प्रकार

Gautami Patil Dance | 'गौतमी'ला पाहून तरुणाईचा तोल गेला; सावरायला पोलिसांच्या काठ्या
लोकमत न्यूज नेटवर्क, वेळापूर (सोलापूर): नृत्यांगना गौतमी पाटील यांचे ‘तुम्हा बघून तोल माझा गेला, तुम्ही सावरायला गप्पकन आला...’ हे गाणं सुरू अन् बेभान झालेल्या तरुणाईने एकच गोंधळ केला. गोंधळ घालणाऱ्या शौकिनांना थंड करण्यासाठी अखेर पोलिसांना दांडा उगारावा लागल्याची घटना घडली.
वेळापूर (ता. माळशिरस) येथील अर्धनारी नटेश्वर यात्रा समितीच्या वतीने पालखी मैदानावर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तरुणाईबरोबर सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. त्यातही महिलांची संख्या मोठी होती. सायंकाळी कलाकारांसोबत स्टेजवर येताच तरुणाईने एकच हंगामा सुरू केला.