सलग चौथ्या दिवशीही नवी पेठेत सर्वत्र शुकशुकाट; पोलीस आज घेणार ‘नो व्हेईकल झोन’चा फेरआढावा

By appasaheb.patil | Published: December 19, 2019 11:00 AM2019-12-19T11:00:49+5:302019-12-19T11:03:19+5:30

व्यवसाय ठप्प; व्यापारी - पोलिसांत झाली चर्चा सुरू, व्यापाºयांनी मागण्यांचे दिले पोलीस उपायुक्तांना निवेदन

On the fourth day in a row, Nuk Peth shook everywhere; Police will take a tour of 'No Vehicle Zone' today | सलग चौथ्या दिवशीही नवी पेठेत सर्वत्र शुकशुकाट; पोलीस आज घेणार ‘नो व्हेईकल झोन’चा फेरआढावा

सलग चौथ्या दिवशीही नवी पेठेत सर्वत्र शुकशुकाट; पोलीस आज घेणार ‘नो व्हेईकल झोन’चा फेरआढावा

Next
ठळक मुद्देनवीपेठेत येणाºया सर्वच मार्गावर बॅरिकेड्स लावण्यात आलेप्रत्येक बॅरिकेड्सपुढे तीन ते चार शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाºयांचा समावेशनवीपेठेच्या या नो व्हेईकल झोनच्या अंमलबजावणीसाठी ५० हून अधिक पोलीस, वाहतूक पोलीस कर्मचाºयांचा बंदोबस्त तैनात

सोलापूर : येथील नवीपेठेत करण्यात आलेल्या नो व्हेईकल झोनमुळे व्यापाºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ नो व्हेईकल झोनमुळे निर्माण झालेल्या त्रुटी व बंद करण्यात आलेले रस्ते खुले करण्यासाठीचे पर्याय शोधण्यासाठी गुरूवार, १९ डिसेंबर रोजी पोलीस उपायुक्त (मुख्यालय) डॉ़ वैशाली कडूकर या नवीपेठेतील व्यापारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेच्या अधिकारी व पोलीस कर्मचाºयांना सोबत घेऊन नवीपेठेची पुन्हा पाहणी करणार आहेत. या पाहणीनंतर पोलीस व व्यापारी यांच्यात बैठक होऊन सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

सोलापूर शहरातील महत्त्वाची समजली जाणारी नवीपेठ ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे़ या बाजारपेठेत शहर पोलिसांनी सोमवारपासून नो व्हेईकल झोनची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली़ या अंमलबजावणीमुळे नवीपेठेत येणारे सर्वच मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत़ त्यामुळे नवीपेठच्या व्यापाºयांवर परिणाम झालेला आहे़ हा झालेला परिणाम पाहता भविष्यात नवीपेठेतील बाजारपेठ संपूर्णपणे नष्ट होईल या भीतीने पोलिसांनी त्वरित नो व्हेईकल झोनचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी नवीपेठ व्यापारी असोसिएशनसोबतच लोकप्रतिनिधी, स्थानिक रहिवासी, सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे़ यावर तोडगा व व्यापाºयांच्या अडचणी समजावून सांगण्यासाठी पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त डॉ़ वैशाली कडूकर यांच्या उपस्थितीत व्यापारी असोसिएशनची बैठक झाली.

 या बैठकीत आपली भूमिका मांडताना व्यापाºयांनी होणाºया अडचणींची माहिती दिली. त्यानंतर पोलीस उपायुक्तांनी शहराच्या विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे़ त्यामुळे व्यापाºयांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले़ शेवटी नो व्हेईकल झोनबाबतीतील अडचणी, त्रुटी, रस्ते खुले करण्यासाठीचे पर्यायी मार्ग यांच्या अवलंबनासाठी गुरुवारी नवीपेठेची पाहणी करण्याचे ठरले़ 
या बैठकीस नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक, उपाध्यक्ष गुलाबचंद बारड, उपाध्यक्ष खुशाल देढिया, जयेश रांभिया, सचिव विजय पुकाळे, सहखजिनदार भावेन रांभिया, राजेंद्र पत्की, श्रीकांत घाडगे आदी उपस्थित होते़ 

चौथ्या दिवशीही व्यापार थंडावलेलाच...!
- नो व्हेईकल झोनमुळे नवीपेठेत गाड्यांचे येणे-जाणे थांबले आहे़ नवीपेठेत येणारे सर्वच मार्ग बंद करण्यात आले आहेत़ त्यामुळे नवीपेठेत खरेदीसाठी ग्राहक येण्याचे प्रमाण कमी झाले आहे़ त्यामुळे नो व्हेईकल झोनच्या अंमलबजावणीच्या तिसºया दिवशीही नवीपेठेतील व्यापार थंडावलेला होता़ दिवसभर ग्राहकांची तुरळक गर्दी होती़ बहुतांश दुकानांत शुकशुकाट दिसून येत होता़ सायंकाळी मात्र काही प्रमाणात खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले़

अशा आहेत व्यापाºयांच्या मागण्या...

  • - नवीपेठेत लावलेले बॅरिकेडिंग तत्काळ काढून रस्ते खुले करा
  • - मेकॅनिक चौक ते दत्त चौक या रस्त्यासह नवीपेठ परिसरातील सर्व वनवे मार्ग बोर्ड लावून पुनर्जीवित करा़
  • - नवीपेठेत दुचाकी वाहनांना प्रवेश द्यावा़
  • - नवीपेठेतील दुकानांसमोर पार्किंगसाठीचे पांढरे पट्टे मारून सम-विषम तारखेनिहाय दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची सुविधा करावी़
  • - नवीपेठेत चारचाकीसाठी पार्किंग व्यवस्था करू नये़
  • - चारचाकी गाडीतून येणाºया ग्राहकांसाठी ड्रॉप अ‍ॅन्ड गो ही सुविधा द्यावी़
  • - नवीपेठेतील अतिक्रमणे मनपाच्या मध्यस्थीने त्वरित हटवावीत
  • - नवीपेठेतील पोलीस पॉइंट जागेवर पोलीस कर्मचाºयांची नेमणूक करावी़
  • - नवीपेठेतील फिरत्या हॉकर्सवर कडक व कायमची कारवाई करावी़
  • - गल्लीबोळातील बंद खोकी, हातगाड्या त्वरित हटवाव्यात
  • - पारस इस्टेटसमोरील जागेत पार्किंगची व्यवस्था सुरू करावी़

आपत्तीजनक घटना घडल्यास कोण जबाबदारी घेणार ?
- नो व्हेईकल झोनमुळे नवीपेठेत येणाºया सर्वच मार्गावर बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत़ त्या बॅरिकेड्ससमोर रस्त्यांवर कार, रिक्षा, टू व्हीलरची पार्किंग होत आहे़ असे असताना काही आपत्तीजनक घटना घडल्यास अग्निशामक दलाच्या गाड्यांना नवीपेठेत येण्यास अडचण निर्माण होणार आहे़ एकवेळेस लावलेले बॅरिकेड्स काढता येतील मात्र लॉक केलेल्या रिक्षा, कार, टू व्हीलर वेळेवर काढता न येण्यासारखे आहे़ नवीपेठेत काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार ? याबाबतही बुधवारी आयुक्तालयात झालेल्या बैठकीप्रसंगी व्यापारी व पोलिसांमध्ये चर्चा झाली.

व्यापारी, लोकप्रतिनिधींसह स्थानिकांना विश्वासात घ्यावे
- नो व्हेईकल झोन करताना सोलापूर शहर पोलिसांनी व्यापारी, लोकप्रतिनिधींसह स्थानिकांना विश्वासात घेतले नाही़ जर विश्वासात घेतले असते तर सकारात्मक मार्ग निघाला असता़ आता नो व्हेईकल झोन करून व्यापारी, स्थानिकांसह लोकप्रतिनिधींना याचा त्रास होत आहे़ आता तरी पोलिसांनी व्यापारी, महापालिकेचे नगरसेवक, स्थानिक व्यापारी, हॉकर्स यांना विश्वासात घेण्यासाठी एक बैठक आयोजित करावी, अशीही मागणी नवीपेठ व्यापारी असोसिएशनने पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़

पोलीस उपायुक्त डॉ़ वैशाली कडूकर यांच्याशी नवीपेठेतील नो व्हेईकल झोनच्या कडक अंमलबजावणीबाबत नवीपेठेतील व्यापाºयांची बैठक झाली़ या बैठकीत व्यापाºयांच्या अडचणी सांगण्यात आल्या़ शिवाय विविध मागण्यांचे निवेदनही पोलीस उपायुक्तांना देण्यात आले़ पर्यायी रस्ते, त्रुटी व उपाययोजनांबाबत व्यापाºयांनी माहिती दिली़ यासाठी गुरूवार, १९ डिसेंबर २०१९ रोजी पोलीस उपायुक्त डॉ़ वैशाली कडूकर या वरिष्ठ पोलीस अधिकाºयांसह नवीपेठेत पाहणी करण्यासाठी येणार आहेत़ पाहणी केल्यानंतर काय मार्ग निघतो ते पाहू़ 
- अशोक मुळीक, अध्यक्ष, नवीपेठ व्यापारी असोसिएशन, सोलापूर

मी नवीपेठ व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाºयांसोबत कोणत्याही प्रकारची बैठक आयोजित अथवा बोलाविली नव्हती़ नवीपेठेतील व्यापारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी बुधवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात माझी भेट घेऊन मला त्यांच्या विविध मागण्यांबाबतचे निवेदन देऊन गेले़ यावेळी कोणत्याही प्रकारचा निर्णय अथवा चर्चा झाली नाही़ मी काही पाहणी वगैरे करणार नाही़ नो व्हेईकल झोनची अंमलबजावणी ही प्रायोगिक तत्वावर आहे़ ती सुरूच राहणार आहे़ 
- डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपायुक्त (मुख्यालय)

नवीपेठेला आले पोलीस छावणीचे स्वरूप
- नवीपेठेत येणाºया सर्वच मार्गावर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत़ प्रत्येक बॅरिकेड्सपुढे तीन ते चार शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश आहे़ नवीपेठेच्या या नो व्हेईकल झोनच्या अंमलबजावणीसाठी ५० हून अधिक पोलीस, वाहतूक पोलीस कर्मचाºयांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ त्यामुळे नवीपेठेला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे़ दिवसभरात दोन ते तीन वेळा वरिष्ठ पोलीस अधिकारी नवीपेठेला भेट देत असल्यामुळे पोलीस कर्मचाºयांनी कडक अंमलबजावणी केली आहे़ नवीपेठेत येणाºया दुचाकीस्वारांवरही कारवाई करण्यात येत आहे़ शिवाय अनधिकृत हॉकर्सवरही कारवाई होत आहे़  

Web Title: On the fourth day in a row, Nuk Peth shook everywhere; Police will take a tour of 'No Vehicle Zone' today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.