सोलापूर शहर पोलिस दलातील चौदा पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 16:43 IST2022-02-09T16:43:14+5:302022-02-09T16:43:19+5:30
पोलीस आयुक्तांचा आदेश : पोलीस खात्यात अचानक उडाली खळबळ

सोलापूर शहर पोलिस दलातील चौदा पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या
सोलापूर : शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या चौदा पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. अचानक निघालेल्या बदल्यांच्या आदेशामुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्रशासकीय कारणास्तव या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात आलेे. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे (कंसात बदलीचे ठिकाण) : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे (जेलरोड पोलीस ठाणे), जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत (जोडभावी पेठ पोलीस ठाणे), सायबर सेलचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील (फौजदार चावडी पोलीस ठाणे), आरसीपीचे पाेलीस निरीक्षक शिवशंकर बोंदर (एमआयडीसी पोलीस ठाणे), जोडभावी पेठ पोलीस ठाणे, दुय्यम पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष), जोडभावी पेठ पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम (सुरक्षा शाखा), जेलरोड पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे (अतिक्रमण प्रतिबंधक विभाग), फौजदार चावडी पोलीस ठाणे, दुय्यम पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट (नियंत्रण कक्ष),.
एमआयडीसी पोलीस ठाणे, संजय पवार (आरसीपी), एमआयडीसी पोलीस ठाणे दुय्यम पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद, फौजदार चावडी पोलीस ठाणे, दुय्यम पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट (जेलरोड पोलीस ठाणे), शहर वाहतूक शाखा (दक्षिण) पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे (एमआयडीसी पोलीस ठाणे), अतिक्रमण विभाग, पोलीस निरीक्षक सय्यद (सायबर सेल) अशी नावे आहेत.
नियंत्रण कक्षातील चार अधिकाऱ्यांची वाहतूक शाखेत बदली
- - नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक संपत पवार व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अंबादास टी. सुनगर यांची बदली शहर वाहतूक शाखा उत्तर येथे करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांची शहर वाहतूक शाखा उत्तर तर पोलीस उपनिरीक्षक विकास घुगे यांची बदली शहर वाहतूक शाखा दक्षिण येथे बदली करण्यात आली आहे.
- - बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ संबंधित बदलीच्या ठिकाणी चार्ज घेण्याचे आदेश देण्यात आले असून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.