दोन दुचाकीच्या धडकेत चौघे जखमी; दोघांची प्रकृती गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 17:30 IST2019-09-25T17:29:24+5:302019-09-25T17:30:15+5:30
पंढरपुर येथील रेल्वे स्टेशनसमोरील येळेवस्ती येथील घटना

दोन दुचाकीच्या धडकेत चौघे जखमी; दोघांची प्रकृती गंभीर
पंढरपूर : येथील रेल्वे स्टेशनसमोरील येळेवस्ती येथे दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली़ यामध्ये दोघे जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे़ या अपघातातील कोणाचेही नाव समजू शकले नाही़ त्यांना पुढील उपचारासाठी येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
प्रत्यक्षदशीर्नी सांगितले की, एम़ एच़ १३ सी़ सी़ ९८७९ या दुचाकीवर एक तरुण कानात हेडफोन अडकवून वेगाने गाडी चालवित होता. समोरून येणाºया दुचाकीवर पती-पत्नी व लहान मुल होते़ त्या तरुणाने समोरून येणाºया एम़ एच़ १३ ए़ ए़ १०५१ क्रमांकाच्या गाडीला जोरदार धडक दिली़ यामध्ये दोन्ही दुचाकी चक्काचुर झाल्या आहेत. त्यात तरुणाला जोरदार मार लागल्याने डोक्यातून, तोंडातून रक्तस्त्राव सुरू होता़ शिवाय दुसºया दुचाकीवरील पतीही बेशुद्ध आहे़ पत्नी आणि ते मुलही जखमी असल्याचे सांगण्यात आले़ अपघाताची माहिती मिळताच पंढरपूर शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.