भाजपचे माजी नगरसेवक सुनील कामाठींचे निधन; खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

By Appasaheb.patil | Updated: February 27, 2023 09:09 IST2023-02-27T09:08:36+5:302023-02-27T09:09:18+5:30

या मिरवणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या गाण्यावर ही त्यांनी ताल धरला होता त्यामुळे ते जास्त चर्चेतही आले होते.

Former BJP corporator Sunil Kamathi passes away; He breathed his last in a private hospital | भाजपचे माजी नगरसेवक सुनील कामाठींचे निधन; खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

भाजपचे माजी नगरसेवक सुनील कामाठींचे निधन; खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

सोलापूर - भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुनील कामाठी यांचे सोमवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले. किडनी खराब झाल्याने त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. 

कामाठी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. सुनील कामाठी यांची खड्डा तालीम प्रसिद्ध आहे.  नुकतेच झालेल्या शिवजन्माचा मिरवणुकीमध्ये सुनील कामाठी यांच्या खड्डा तालीमने मोठी जंगी मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या गाण्यावर ही त्यांनी ताल धरला होता त्यामुळे ते जास्त चर्चेतही आले होते. त्याच्यावर दुपारनंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Web Title: Former BJP corporator Sunil Kamathi passes away; He breathed his last in a private hospital

टॅग्स :BJPभाजपा