धनाड्यांची थकबाकी भरणाºया सरकारला शेतकºयांचा विसर, शरद पवार यांची भाजपावर टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:22 PM2018-06-13T13:22:11+5:302018-06-13T13:22:11+5:30

कुर्डूवाडीत काशिनाथ भिसे यांच्या पुतळ्याचे अनावरण; विविध विकासकामांचा शुभारंभ

Forgetting farmers' outstanding dues, Pawar forgets Sharad Pawar's BJP | धनाड्यांची थकबाकी भरणाºया सरकारला शेतकºयांचा विसर, शरद पवार यांची भाजपावर टिका

धनाड्यांची थकबाकी भरणाºया सरकारला शेतकºयांचा विसर, शरद पवार यांची भाजपावर टिका

Next
ठळक मुद्देबळीराजा जागृत अन् संघटित झाला पाहिजे - खा. शरद पवारशेतकºयांच्या उसाला, पिकांना दर मिळत नाही - खा. शरद पवार

कुर्डूवाडी : राज्यातील भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी सरकार आहे. राज्यातील उद्योजक, कारखानदार अशा धनदांडग्यांची बँकांकडे असणारी ८५ हजार कोटींची थकबाकी भरण्याची तयारी दर्शविणाºया या सरकारला मात्र शेतकºयांचा विसर पडला आहे, अशी टीका माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, खासदार शरद पवार यांनी केली. 

येथील के. एन. भिसे महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्व. काशिनाथ भिसे यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि विविध विकासकामांचा शुभारंभ मंगळवारी सकाळी खा. शरद पवार यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार गणपतराव देशमुख होते. माजी आमदार विनायकराव पाटील यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा पवार यांच्या हस्ते यथोचित सत्कारही करण्यात आला. 

खा. शरद पवार म्हणाले, बळीराजा जागृत अन् संघटित झाला पाहिजे. शेतकºयांच्या उसाला, पिकांना दर मिळत नाही. शेतात राबणाºया शेतकºयांच्या दामाला दाम मिळत नाही. ती मिळवून घेण्याची ताकद तुमच्या- आमच्यामध्ये आहे.

शेतकºयांनी एकत्र येऊन जागरुक बनले तर मी तुम्हाला शब्द देतो की सध्याच्या केंद्र आणि राज्यातील राजकारण बदलल्याशिवाय गप्प बसणार नाही. समाजकारणात असताना आपण जागरुक राहणे गरजेचे आहे. योग्य निर्णय घेतले नाही तर त्याचे परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागतील, असे सांगत शरद पवार यांनी स्व. के. एन. भिसे यांच्या आठवणींना उजाळा देत विनायकराव पाटील यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. माढा तालुक्यात नेतृत्व करण्याची शक्ती आहे. स्व. गणपतराव साठे, स्व. भाई एस. एम. पाटील यांनी नेतृत्व केले. आता ती धुरा आमदार बबनराव शिंदे, जि. प. अध्यक्ष संजय शिंदे हे सांभाळत आहेत. आता आम्ही नवीन पिढीसाठी जागा मोकळ्या केल्या पाहिजेत़ त्या पद्धतीचे चित्र तयार करुन नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करावी लागेल. 

 प्रारंभी आमदार बबनराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राजेंद्र दास यांनी मानपत्राचे वाचन केले. ‘जीवन प्रवाह’ या स्मरणिकेचे प्रकाशनही खा. पवार यांच्या हस्ते झाले. आ. दिलीप सोपल, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी आपल्या भाषणात विनायकराव पाटील यांच्यासोबतचे अनुभव सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी माजी खा. पद्मसिंह पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, आ.भारत भालके, आ.दत्तात्रय सावंत, आ. विक्रम काळे, जि. प. अध्यक्ष संजय शिंदे, माजी आ. राजन पाटील, दीपक साळुंखे, जयवंतराव जगताप, रश्मी बागल, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, रामदास महाराज, बळीराम साठे, पं. स.चे सभापती विक्रमसिंह शिंदे, जि. प. सदस्य रणजितसिंह शिंदे, माढा वेल्फेअरचे धनराज शिंदे, नगराध्यक्ष समीर मुलाणी, रिपाइंचे बापूसाहेब जगताप, भोसरेचे सरपंच अ‍ॅड. धनाजी बागल, वामन उबाळे, सुरेश बागल, बार्शी शिवाजी शिक्षण मंडळाचे डॉ. बी. वाय. यादव, जयंत पाटील, अर्जुनराव बागल, संजय गोरे, विश्वासराव कचरे, भीमानगरचे संजय पाटील, रमेश पाटील, डॉ. शशिकांत त्रिंबके आदी उपस्थित होते. आभार प्रा. डॉ. आर. आर. पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव बाळासाहेब भिसे, विश्वनाथ ठोकडे, मुख्याध्यापक रावसाहेब पाटील, औदुंबर पाटील, बाळासाहेब पाटील, सुनील पाटील, सुधीर कौलगे, जयश्री भिसे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Forgetting farmers' outstanding dues, Pawar forgets Sharad Pawar's BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.