कोरफळे येथील वनीकरणाला आग, सुदैवाने जीवितहानी टळली
By दिपक दुपारगुडे | Updated: March 9, 2024 17:23 IST2024-03-09T17:22:14+5:302024-03-09T17:23:20+5:30
कोरफळे, ता. बार्शी येथील गोळीबार मैदानावर लागलेल्या आगीत वनीकरणातील शेकडो झाडे होरपळली आहेत.

कोरफळे येथील वनीकरणाला आग, सुदैवाने जीवितहानी टळली
दीपक दुपारगुडे,सोलापूर : कोरफळे, ता. बार्शी येथील गोळीबार मैदानावर लागलेल्या आगीत वनीकरणातील शेकडो झाडे होरपळली आहेत. मात्र बार्शीचे वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले यांच्या प्रसंगावधानाने व बार्शी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या वाहनाने तसेच वन कर्मचारी व ग्रामस्थांच्या प्रयत्नाने ही आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठे नुकसान टळले.
दोन वर्षांपूर्वी या गोळीबार मैदानावर ११,१११ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. गेल्या दोन्ही उन्हाळ्यात टँकरने पाणी घालून ही झाडे चांगली जोपासली होती. सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावरील शेतकऱ्याने पेटवलेल्या बांधाची ठिणगी वन विभागाशेजारच्या शेतावर पडून ही दुर्घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आगीत जळीतग्रस्त झाडांना लगेच पाणी सुरू केले आहे. लहान असलेली ८ ते १० टक्के झाडे जळालेली आहेत. ९० टक्के झाडे पुन्हा फुटून येतील. सर्वांच्या प्रयत्नाने मोठा अनर्थ टळला असल्याचे वन परिक्षेत्र आधिकारी मनोज बारबोले यांनी सांगितले.