अतिवृष्टीमुळे पंढरपूरला पुराचा फटका, नदीकाठी राहणाºया लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 11:56 AM2020-10-15T11:56:26+5:302020-10-15T12:00:28+5:30

पावसाचा हाहाकार; सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून जीव रक्षक, एनडीआरएफची टीम तैनात 

Floods hit Pandharpur due to heavy rains, people living along the river evacuated to safer places | अतिवृष्टीमुळे पंढरपूरला पुराचा फटका, नदीकाठी राहणाºया लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

अतिवृष्टीमुळे पंढरपूरला पुराचा फटका, नदीकाठी राहणाºया लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं

googlenewsNext
ठळक मुद्देव्यास नारायण, अंबाबाई पटांगण,लखुबाई, आंबेडकर नगर झोपडपट्टी आदी भागातील जवळपास ५०० कुटुंबांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था केलीउजनी धरण आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहेशहरातील काही भागात दुपार पर्यंत पुराचे पाणी जाण्याची शक्यता आहे

सोलापूर : सततच्या पावासामुळे ओढे,नाले भरून वाहिले. त्यातच उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग, याचा परिणाम पंढरपूर शहर आणि नदीकाठच्या गावांवर झाला आहे़ अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती ओढावली आहे. शहरातील नदीकाठच्या जवळपास ८०० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे़ ग्रामीण भागात देखील नागरिकांना स्थलांतरीत केले आहे.

पंढरपूरकडे येणारे सातारा, पुणे सोलापूर, मंगळवेढा या ठिकाणची वाहतूक बंद केली तर काही ठिकाणी वळविण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे. दरम्यान,चंद्रभागा नदीत येणारा पाण्याचा विसर्ग पाहता दुपार पर्यंत शहरातील अनेक भागात पुराचे पाणी जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. पंढरपूरला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. बुधवारी कुंभार घाटावरील भिंत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला होता. या सततच्या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. पंढरपूर परिसरातील ओढे, नाले भरून वाहू लागले ते पाणी चंद्रभागा नादित जाऊन मिसळले. त्यात भर म्हणून उजनी आणि वीर धरणाचे पाणी मिसळून नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

व्यास नारायण, अंबाबाई पटांगण,लखुबाई, आंबेडकर नगर झोपडपट्टी आदी भागातील जवळपास ५०० कुटुंबांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था केली. आज सकळी अजून ३०० असे एकूण ८०० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. उजनी धरण आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे शहरातील काही भागात दुपार पर्यंत पुराचे पाणी जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जीव रक्षक, एनडीआरएफची टीम तैनात केली आहे.

नागरिकाना सतर्कतेचा इशार दिला आहे. तर दुसरीकडे पंढरपूर ते सातारा,पुणे,सोलापूर,मंगळवेढा याठीकाणचे पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद ठेवली आहे. काही ठिकाणी पयार्यी मागार्ने वाहतूक सुरु केली आहे .एकंदरीत एकीकडे करोनाचे संकट असताना आता दुसरीकडे पुराचा फटका तालुक्याला बसला आहे. तर या अतिवृष्टीचा फटका बळीराजाला देखील बसला आहे.

Web Title: Floods hit Pandharpur due to heavy rains, people living along the river evacuated to safer places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.