सीना नदीला महापूर; देशमुख कुटुंबातील सात जण नदीपात्रात अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 14:55 IST2020-10-15T14:31:16+5:302020-10-15T14:55:45+5:30
मंगळवेढा-सोलापूर महामार्ग केला बंद; तहसिल प्रशासन अलर्ट

सीना नदीला महापूर; देशमुख कुटुंबातील सात जण नदीपात्रात अडकले
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथे सिना नदीच्या काठाला पोपट उर्फ नेताजी देशमुख यांची शेतामध्ये वस्ती आहे़ गेल्या अनेक वर्र्षापासून तेथे स्थायिक आहेत.
परवाच्या पावसामध्ये सीना नदीला महापूर आल्याने पोपट्ट देशमुख यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील चेतन देशमुख, सीमा देशमुख, माधुरी देशमुख, शुभांगी देशमुख, वीर महारनवर ( वय ५ वर्षे) अक्षरा महारनवर (वय वर्ष दोन) असे सात जण या नदीपात्रात मध्ये अडकून पडले आहेत़ पहाटेपासून सदर कुटुंब मदतीसाठी सर्वांना हाक देत आहे, परंतु अद्याप त्यांना कुठूनच मदत उपलब्ध झाली नाही किंवा त्याना बाहेर निघण्याचा पर्याय प्रशासनाने अवलंबला नाही असं चेतन देशमुख यांनी कळविले आहे़ पाण्यात अडकलेल्यांना मदत करण्यासाठी प्रशासनाने मदत करण्याचे आवाहन चेतन देशमुख यांनी आवाहन केले आहे.