दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठेच्या बाजार तळात पुराचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 13:07 IST2019-08-09T13:03:16+5:302019-08-09T13:07:35+5:30
शाळांना सुट्टी : तेलगाव- भंडारकवठे रस्ता जलमय

दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठेच्या बाजार तळात पुराचे पाणी
सोलापूर : भीमा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील बाजार तळ पाण्याखाली गेला मुख्य चौकाजवळ पाणी येऊन ठेपल्याने ग्रामस्थांची मोठी अडचण झाली आहे दरम्यान गुरुवारी भंडारकवठे येथील शाळांना सुट्टी देण्यात आली होती.
गेल्या दोन-तीन दिवसापासून भीमा नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. भंडारकवठे येथे पणन विभागाकडून नव्यानेच बाजार कट्टे बांधण्यात आले आहेत गावाच्या जवळ असलेल्या या बाजार तळाला नदीचे पाणी येऊन ठेपले आहे जवळच असलेल्या टपऱ्याना या पुराच्या पाण्यामुळे धोका होण्याची टपरीधारकांनी भीती वाटत आहे त्यामुळे आज दिवसभर ग्रामस्थ पूर ओसरण्याची वाट पहात होते पाणी कमी जास्त होत असल्याने ग्रामस्थही चिंताग्रस्त झाले आहेत.
नदीपात्र पासून जवळच जीवन विकास प्रशाला आहे शाळा आणि नदी यातील अंतर कमी असल्याने शाळकरी मुले अनावधानाने नदीकडे जाण्याची भीती शाळा व्यवस्थापनाला वाटल्याने गुरुवारी शाळेला सुट्टी देण्यात आली जिल्हा परिषदेच्या शाळा नाही आज दिवसभराची सुट्टी होती काही पालक शेतातील वस्त्यांमध्ये राहत असल्याने मुलांना शाळेत पाठवणे त्यांना अडचणीचे वाटत होते
--------
रस्ते जलमय
दक्षिण सोलापूर तालुक्यात बहुतांशी रस्ते नव्याने करण्यात आले आहेत पूवीर्चे रस्ते सखल भागात असल्याने भीमा नदीला पूर आल्यानंतर रस्त्यावर पाणी साठत होते यावेळी तसे घडले नाही मात्र तेलगाव ते भंडारकवठे रस्त्यावर काही वेळ पाणी आल्याने रस्ता जलमय झाला होता काही काळ वाहतूक थांबली होती