शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दोन दिवसात सोलापूरला औषधांचा  पुरवठा सुरळीत करा अन्यथा उच्च न्यायालयात जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 3:03 PM

भाजप नेत्यांनी दिला महाविकास आघाडी सरकारला इशारा

सोलापूर : महाविकास आघाडी सरकारचा कारभार निष्क्रिय असून या  कोरोना काळात सरकार कडून सोलापूर जिल्ह्यावर अन्याय होतोय. सोलापुरात ऑक्‍सिजनचा प्रचंड तुटवडा आहे. त्यासोबत रेमेडेसिविर इंजेक्शनचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतोय. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. पुढील दोन दिवसात सोलापूरला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत न झाल्यास सरकार विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे  भारतीय जनता पार्टीच्या खासदार आणि आमदारांनी सांगितले. 

सोलापूरच्या वाट्याचे पाणी चोरणारे महाविकास आघाडीतील नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात रोष व्यक्त करत सोलापूर जिल्ह्यातील आठ आमदार आणि दोन खासदारांनी सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले. भाजप खासदार आणि आमदारांचे म्हणणे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विभागीय आयुक्तांच्या कानावर घातले. विभागीय आयुक्तांना फोन लावून भाजप नेत्यांशी संवाद घडवून आणला. विभागीय आयुक्तांनी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिल्यानंतर भाजप नेत्यांनी उपोषण मागे घेतला.

सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी,  खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील, प्रशांत परिचारक, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, समाधान आवताडे,  राजेंद्र राऊत आदी आमदार उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाPoliticsराजकारणcorona virusकोरोना वायरस बातम्या