अकलूजच्या सराईत गुन्हेगारासह पाच जण एक वर्षांसाठी तडीपार; सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई
By Appasaheb.patil | Updated: May 31, 2023 16:54 IST2023-05-31T16:52:53+5:302023-05-31T16:54:59+5:30
टोळी प्रमुख व टोळी सदस्यावर वेळोवेळी कारवाई करून देखील सुधारणा न झाल्याने सराईत गुन्हे करणा-या निखील शिरसट व टोळीतील पाच जणांना पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सोलापूर जिल्हयातून एका वर्षाकरिता हद्दपार केले.

अकलूजच्या सराईत गुन्हेगारासह पाच जण एक वर्षांसाठी तडीपार; सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई
सोलापूर : सोलापूर ग्रामीण घटकातील अकलूज पोलीस ठाणे येथे निखील शिरसट व त्याच्या टोळीतील साथीदाराविरुद्ध मालमत्ता जबरीने घेणे, घातक हत्याराचा वापर करून इच्छापूर्वक दुखापत पोहचवणे, इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचवणे, मालमत्तेचे नुकसान करून आगळीक करणे, तलवार काठया यासारखे हत्यार घेवून गैरकायदयाची मंडळी जमवून दंगा करणे, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करून समाजात दहशत पसरवली होती.
टोळी प्रमुख व टोळी सदस्यावर वेळोवेळी कारवाई करून देखील सुधारणा न झाल्याने सराईत गुन्हे करणा-या निखील शिरसट व टोळीतील पाच जणांना पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सोलापूर जिल्हयातून एका वर्षाकरिता हद्दपार केले. दरम्यान, निखील नवनाथ शिरसट, शंकर अशोक काळे, माउली उर्फ ज्ञानेश्वर अशोक काळे, रोहीदास सुरेश काळे, आकाश रमेश धोत्रे, राजु ज्ञानेश्वर काळे (सर्व रा. व्यंकटनगर, अकलुज ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
हद्दपार लोक हे सोलापूर जिल्हयात वावरत असल्याचे आढळल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ पोलीस ठाणेस व नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण येथे कळवावे असे आवाहन केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक, हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. सुहास जगतपा, पो.नि. गायकवाड, तसेच सपोफी जाधवर, पो.ना. अनिस शेख, स्थानिक गुन्हे शाखा, पो.हे.कॉ. बकाल, पठाण व इतर अंमलदार यांनी कारवाईत संयुक्तपणे कामकाज केला आहे.