शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

फिटनेस के फंडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 12:08 IST

गावातल्या सरपंचांचं थोरलं पोरगं अलीकडं एकदमच मॉडर्न झालंय. शिकायला पुण्यात गेल्याचा परिणाम, दोस्तांच्या संगतीनं त्यानंही आता टी शर्ट, जीन्स घालायला सुरुवात केलीय.

रविंद्र देशमुख

गावातल्या सरपंचांचं थोरलं पोरगं अलीकडं एकदमच मॉडर्न झालंय. शिकायला पुण्यात गेल्याचा परिणाम, दोस्तांच्या संगतीनं त्यानंही आता टी शर्ट, जीन्स घालायला सुरुवात केलीय. पुण्यातनं इंटरसिटीनं उतरून गावात येताना अन् पुण्याला जाण्यासाठी कुर्डूवाडी गाठताना मोठ्या डौलात जातोय लेकाचा..पण पोरगं मात्र स्वभावानं गोड, थोरामोठ्यांचा आदर करणारं... गावात आल्यानंतर पारावर सर्वांना आवर्जून भेटून ख्याली - खुशाली विचारणारं...त्याचे सरपंच वडील मात्र सारखं पोरावर वैतागलेले...पारावर बसल्यानंतर थोरल्या आबाजवळ सरपंच नेहमी म्हणायचे, कारटं मुलखाचं आळशी हाय. पुण्यातनं इथं आलं की, नुसतं अंथरुणावर लोळत असतं. एक काम ऐकत नाय. तरणंताठं वय हाय पण बघा त्याची ढेरी.. त्याची जाडी. नुसतं जीन पॅन्ट अन् भडक रंगाचे कपडे घालून मिरवत असतया..आबा तुम्हीच सांगा त्याला. जरा व्यायाम करावा, तालमीत मेहनत करावी...आमच्या घराण्याच्या परंपरेप्रमाणे पैलवानकी करावी...नुसतंच शिकला - सवरला म्हणून काय, त्याला चांगली पोरगी मिळणार हाय व्हय..सरपंच थोरल्या आबांना हे सांगताना अधिकच वैतागून गेले होते.

आबा, उद्या सकाळी त्याला तुमच्याकडं पाठवितो, पारावर. तुमचं ऐकतंया त्यो...जरा त्याला समजून सांगाच..नाही तर उद्या छकाटी घेऊन त्याला पाटं उठविणार हाय अन् तालमीला धाडणार हाय!

थोरल्या आबांची तब्येत म्हणजे एकसवडी, आयुष्यभराचे काडी पैलवान. आता या सरपंचांच्या पोराला काय सांगायचं..जो व्यायाम आपण आयुष्यभर कधी केलाच नाही, त्याच्याबद्दल दुसºयाला काय सांगायचं?...आबा विचार करू लागले..अन् स्वत:शीच पुटपुटले.     बघू उद्या, जे सूचल ते सांगू.....दुसºया दिवशी घरातून पाराकडे येताना, आबांना फिटनेसचे फंडे सुचले..भराभर त्यांच्या डोळ्यासमोर पवारसाहेब, शिंदेसाहेब, महाराज अन् बाळासाहेब तरळून गेले...बस्स आता सरपंचाच्या पोराला या नेत्यांची उदाहरणं द्यायची अन् व्यायामाचं महत्त्व सांगायचं...आबांनी ठरवलं.

सरपंचानं बजावल्यानुसार पोरगं सकाळी पारावर आलं. थोरल्या आबांना झुकून नमस्कार केला...आबांनीही त्याला प्रेमानं शेजारी बसवून घेतलं. बेटा, बाप म्हणत हुता तू मेहनत करत नाय, जाडी वाढलीया, रानात कधी जायची वेळ आलीय तर दमछाक व्हतीया तुझी...मग जरा यायाम करत जा, तालमीत जात जा...तुमच्या पुण्यातपण लई तालमी हैती म्हणं. मशनी हायत्या व्यायामाच्या...जरा करत जा तिथं जाऊन मेहनत...सरपंचाचा पिंटू म्हणाला, आबा मला नाही जमत ते.

आबा, समजुतीच्या सुरात म्हणाले, तू नेहमी राजकारणाची चर्चा करतो..सध्या तर इलेक्शनचा माहोल...कालच तू पवारसाहेब,शिंदे साहेबांचं नाव घेत व्हता..कमळवाले महाराज अन् अकोल्यावरून आलेल्या बाळासाहेबांबद्दलही सांगत व्हतास...या नेत्यांकडं बारकाईनं बघ जरा, पवारसाहेब, शिंदेसाहेब तर वयाची पंच्याहत्तरी पार करून गेलेत..माझ्यापेक्षाही दोन - तीन वर्षांनी मोठे हायती; पण प्रचाराला आले की कस्सं तरातरा चालतात. तुझ्यासारख्या तरण्याताठ्यांना लाजविणारा त्यांचा वावर असतो अन् तू बघ.. पारावर चालत येताना तुला दम लागलाय..ह्यो बघ, ह्यो बघ हा पेपर..शिंदेसाहेब कसे त्या काय तर म्हणं बॅरिकेडवर चढून सभेच्या मंडपात जात आहेत. आरं वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी, ह्यो माणूस तरण्यासारखा उड्या मारतोय...आयुष्यभर थोडी मेहनत केली असेल म्हणूनच ते असं हालचाली करत असतील ना!..पवारसाहेब तर बघ, वयानं आणखी थोरले...त्या जीवघेण्या आजारातून स्वत:च्या हिंमतीनं बाहेर पडले अन् कसे राज्यभर दौरे करू लागलेत. काल आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी होतं ते..अंगातून पाणी काढणारं उनं व्हती; पण साहेब थोडेतर थकलेलं दिसले का?..बेटा, तरुणवयात यायाम केल्याचा परिणाम हाय त्यो.

आंबेडकरांचे बाळासाहेबही आता चौसष्ट वर्षाचं हायती, पण तिकडं अकोल्यात बी लढतात अन् सोलापुरात बी...शिवाय दुसºयाचा प्रचार करण्यासाठी दौरे करतात...आयुष्यभर शरीराला कष्ट दिल्याचाच हा परिणाम, बरं का बेटा. कमळवाले महाराज बी साठी पार केलेले...गावोगाव जाऊ लागलेत...सकाळी सकाळी लोकांना वॉकिंगच्या ठिकाणी जाऊन भेटू लागलेत...ना थकवा, ना कंटाळा.बेटा, कर जरा इच्चार..जर या वयातच मेहनत कर म्हणजे म्हातारपणातही तरणा दिसशील...नाही तर नुसतं कपडे घालून मिरविण्यात काय हाशील?...सरपंचाच्या पोराला आबांनी सांगितलेले फिटनेसचे फंडे पटले...अन् थोरल्या आबांना नेत्यांसारखं चपळ राहण्याचा शब्द देऊन तो घराकडे परतला. -

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढा