शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

शाळेच्या पहिल्या दिवशीच ग्रामस्थांनी शाळेला लावले कुलूप, सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 3:25 PM

माढा तालुक्यातील लोंढेवाडी येथे रिक्त असलेली शिक्षकाची जागा भरण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या शाळेस पहिल्याच दिवशी कुलप लावून शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले़

ठळक मुद्दे- शिक्षक पद भरण्याची ग्रामस्थांची मागणी- भजन, किर्तन करीत शासनाचा केला निषेध- एक महिन्याच्या आत पद भरण्याचा दिला वरिष्ठांनी शब्द

वडशिंगे : माढा तालुक्यातील लोंढेवाडी येथे रिक्त असलेली शिक्षकाची जागा भरण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या शाळेस पहिल्याच दिवशी कुलप लावून शाळेसमोर ठिय्या आंदोलन केले़ याचवेळी शासनाचा निषेध करीत ग्रामस्थांनी भजन, किर्तन सादर केले़ मात्र विस्तार अधिकारी व जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी केलेल्या यशस्वी शिष्टाई व एक महिन्याच्या आत जागा भरण्याचे आश्वासन दिल्या नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

या आंदोलनाने  शिक्षण विभागाची तारांबळ उडाली असल्याचे चित्र पहायला मिळाले. परिसरातील सर्वत्र शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वगात चॅकलेट, फुगे, गुलबपुष्प देऊन पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके देण्याचे कार्यक्रम होत आसताना लोंढेवाडी येथे आंदोलनाने सुरूवात झाली़ यावेळी विस्तार अधिकारी बंडू शिंदे यांनी या ठिकाणी भेट देऊन  प्रशासन व ग्रामस्थाकडून यांच्या वतीने एक महिन्यात शाळेस शिक्षक देण्यात येणार आसल्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रमास्थाकडून हे अंदोलन मागे घेण्यात आले आहे.

यावेळी शाळेस कुलुप लावल्याने विद्यार्थी गेट बाहेर चालु असलेल्या आंदोलनात सामील झाल्याचे पहायला मिळाले.  या ठिकाणी पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे़ या शाळेत  ८० ते ९० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  पहिली  ते पाचवी पर्यंत तीन शिक्षक तर सहावी व सातवी साठी प्रत्येकी एक शिक्षकाची नेमणूक होती. मात्र गेल्या वर्षी एक शिक्षकाची बदली झाली होती. त्या जागी दुसºया शिक्षकाची नेमणूक करण्यात आली नाही. शालेय पत्रव्यवहार करण्यास व मुख्याध्यापक पदाची दोन्ही  जबाबदाºया एका शिक्षकाकडे आहे. शिक्षक अप्रशिक्षीत असल्याने त्या शिक्षकाला वर्षातून तीन वेळा  २८ दिवस प्रति  प्रशिक्षण याप्रमाणे प्रशिक्षण  घेण्यासाठी जावे लागते यामुळे दोन  शिक्षक किती वर्गाला शिकवणार हा प्रश्न निर्माण झाल्याने आंदोलन करण्याची वेळ आल्याचे माजी सरपंच संतोष लोढे यांनी सांगितले़

यावेळी माजी सरपंच रामहरी लोंढे संतोष लोंढे, विस्तार अधिकारी बंडू शिंदे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादा इंगळे, केंद्रप्रमुख विष्णू बोबडे, पांडुरंग बोबडे, पंढरीनाथ बोबडे, सुरेश लोंढे, दशरथ इंगळे, भारत बोबडे, बाबा लोंढे, संदीप लोंढे, जाकीर तांबोळी, राजू तांबोळी, परमेश्वर देवकर, कृष्णा बोबडे, शोभा शिंदे, साधना मोरे, निकीता गाडेकर, सुजाता सुतार, मंगल कदम, भाऊसाहेब बोबडे, अतुल केदार, दिलीप लोंढे, नामदेव मोरे,  बिनु बोबडे, सर्जेराव लोंढे, प्रकाश आवघडे, ज्ञानदेव मुळुक आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदeducationशैक्षणिक