शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीत पुठ्याच्या गोडाऊनला आग, गॅस टाकीचा स्फोट, एकाचा होरपळून मृत्यू, तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 14:16 IST

बार्शी : बार्शी (जि. सोलापूर ) शहरातील मनगिरे मळा या ठिकाणी असलेल्या कागदी पुठ्याच्या गोडाऊनला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात राजेश रामावतार साहू (वय ४०) याचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की, मनगिरे ...

ठळक मुद्देकागदी पुठ्याच्या गोडाऊनला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झालाराजेश रामावतार साहू (वय ४०) याचा जागीच होरपळून मृत्यू

बार्शी : बार्शी (जि. सोलापूर) शहरातील मनगिरे मळा या ठिकाणी असलेल्या कागदी पुठ्याच्या गोडाऊनला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात राजेश रामावतार साहू (वय ४०) याचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले आहेत. 

या बाबत अधिक माहिती अशी की, मनगिरे मळा येथे उत्तरप्रदेश येथून आलेल्या साहू परिवाराचा पुठ्याचा व्यवसाय होता. पुठ्ठा ठेवण्यासाठी पत्र्याचे मोठे शेड मारून गोडाऊन तयार केले होते व यातच शाहू परिवार राहत होते. शुक्रवारी (ता.५) पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटने पुठ्यांना आग लागली. संपूर्ण गोडाऊन पुठ्यांनी भरलेले असल्याने क्षणार्धात संपूर्ण गोडाऊन आगीच्या भक्षस्थानी पडले. 

यावेळी घरामध्ये राजेश रामावतार साहू व त्याची पत्नी आरती राजेश साहू हे दोघे होते. तर इतर दोन सदस्य लहान मुलाला घेऊन वॉचमन म्हणून कामावर गेलेले होते. आग अचानक भडकल्याने घरातील दोन्ही सदस्यांना बाहेर पडता आले नाही. राजेश याचा बेडरूममध्ये जागेवरच होरपळून मृत्यू झाला. त्याचा अक्षरश: कोळसा झाला होता. तर आरती बाथरूम मध्ये जखमी अवस्थेत पडलेली होती. आग लागल्यानंतर गोडाऊन समोरील विनायक केसकर व भाऊबली नगरकर व आवदेश रामराव साहू हे आग विझवण्याचा प्रयत्न करत असतानाच गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. 

दरम्यान पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या गोडाऊनला आग लागल्याचे समजताच नगरपालिका विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे, अजित कुंकुलोळ यांनी घटनास्थळी धाव घेत मदत यंत्रणा राबवली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने गोडाऊनचे पत्रे काढून आग विसवण्यास मदत केली. जखमींवर उस्मानाबाद येथे उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरFairजत्राPoliceपोलिसBarshitakliबार्शिटाकळी