सोलापुरातील कर्णिक नगरातील फटाके स्टॉलला लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:50 IST2018-11-05T13:45:12+5:302018-11-05T13:50:53+5:30
सोलापूर : सोलापूर शहरात असलेल्या कर्णिक नगर भागातील रिक्षा स्टॉपजवळील फटाके स्टॉलला आग लागली. या घटनेची माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक ...

सोलापुरातील कर्णिक नगरातील फटाके स्टॉलला लागली आग
सोलापूर : सोलापूर शहरात असलेल्या कर्णिक नगर भागातील रिक्षा स्टॉपजवळील फटाके स्टॉलला आग लागली. या घटनेची माहिती सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचे काम वेगात सुरू असून घटनास्थळी अग्निशामक दलाचे केदार आवटे, नगरसेवक गुरूशांत धुत्तरगांवकर आदी उपस्थित आहेत. कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही, वेळेवर अग्निशामक दलाच्या गाड्या आल्याने पुढील अनर्थ टळला असल्याची माहिती नगरसेवक गुरूशांत धुत्तरगांवकर यांनी दिली.
पूर्व भागात वालचंद महाविद्यालय परिसरात असलेल्या कर्णिक नगरातील रिक्षा स्टॉपजवळील व्यंकटेश ईट्टम यांच्या फटाके स्टॉलला अचानक आग लागली. या आगीत दुकानातील फटाक्यांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती नगरसेवक गुरूशांत धुत्तरगांवकर यांनी अग्निशामक दलाला दिल्याने वेळेत अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. वेळेत आग विझविल्याने पुढील अनर्थ टळल्याने अग्निशामक दलाच्या अधिकाºयांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.