मोठी बातमी! सोलापुरातील लक्ष्मीनारायण थिएटर परिसरातील घरांना लागली आग
By Appasaheb.patil | Updated: March 10, 2023 12:14 IST2023-03-10T12:14:33+5:302023-03-10T12:14:54+5:30
आग विझविण्यासाठी परिसरातील लोकही मोठया प्रमाणात मदत करीत आहे.

मोठी बातमी! सोलापुरातील लक्ष्मीनारायण थिएटर परिसरातील घरांना लागली आग
सोलापूर : शहरातील आकाशवाणी केंद्र परिसरात असलेल्या लक्ष्मीनारायण थिएटर एमआयडीसी भागातील दोन घरांना अचानक आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे लोळ मोठया प्रमाणात बाहेर पडत आहेत. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे काम वेगात सुरू आहे.
दरम्यान, आग विझविण्यासाठी परिसरातील लोकही मोठया प्रमाणात मदत करीत आहे. आगीच्या परिसरातच महावितरणचा डीपी बॉक्स आहे. मात्र महावितरणने खबरदारी म्हणून या भागातील विद्युत पुरवठा बंद केला आहे. घटनास्थळावर अग्निशामक दलाचे वरिष्ठ अधिकारी, शहर पोलिस दलातील अधिकारी दाखल झाले आहेत. या आगीत घरातील संसारोपयाेगी साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून शहरात आगीच्या घटना वारंवार घडत आहे. अक्कलकोट एमआयडीसी भागातील कारखान्यांनाही आगी लागल्याच्या घटना ताज्या आहेत.