पोलिसांचा मनाई आदेश धुडकवल्यानं बस चालकाविरुद्ध एफआयआर
By विलास जळकोटकर | Updated: April 18, 2023 16:21 IST2023-04-18T16:21:00+5:302023-04-18T16:21:24+5:30
या प्रकरणी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांचा मनाई आदेश धुडकवल्यानं बस चालकाविरुद्ध एफआयआर
विलास जळकोटकर, सोलापूर : पोलिसांचा बंदीच्या आदेशाला धुडकावून बेकायदा खाजगी प्रवासी बस वेगाने चालवल्यानं बस चालकाच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा नोंदला आहे. या प्रकरणी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तक्रार दिली आहे.
गेल्या दहा मार्चपासून सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते एसटी बस स्थानक या रस्त्यावर खाजगी वाहन उभी करणे, चालवणं यासाठी सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत प्रतिबंध घालण्यात आला आहे. असे असतानाही या मार्गावरून सोमवारी दुपारी बस वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. यामुळे फौजदार निळकंठ ताटेदार यांनी खाजगी बस चालक झाकीर सय्यद याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"