अखेर पत्र निघालं; या तारखेच्या आत होणार जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी

By आप्पासाहेब पाटील | Updated: February 25, 2026 17:52 IST2026-02-25T17:52:27+5:302026-02-25T17:52:27+5:30

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे.

finally the letter has been sent elections of zilla parishad and panchayat samiti office bearers will be held within this date | अखेर पत्र निघालं; या तारखेच्या आत होणार जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी

अखेर पत्र निघालं; या तारखेच्या आत होणार जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडी

आप्पासाहेब पाटील, साेलापूर : राज्यातील १२ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समितीचे सभापती व उपसभापती निवडीचा कार्यक्रम २० मार्च २०२६ च्या आत घेण्याच्या सुचना ग्रामविकास विभागाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती यांची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या बैठका घेणे आवश्यक आहे.  महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ च्या कलम ११(१) आणि कलम ५९ (१) मधील तरतुदीनुसार सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा पहिल्या बैठकीपासून सुरु होतो.

जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार, जिल्हा परिषदा तसेच पंचायत समित्यांची पहिली बैठक २० मार्च, २०२६ पूर्वी आयोजित करावी असे ग्रामविकास विभागाने पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर व परभणी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्राव्दारे कळविले आहे.

Web Title : जिला परिषद, पंचायत समिति चुनाव 2026 से पहले: आदेश जारी

Web Summary : ग्राम विकास विभाग ने जिलाधिकारियों को 20 मार्च 2026 तक जिला परिषद और पंचायत समिति चुनाव कराने का निर्देश दिया। इसमें बारह जिला परिषदों और 125 पंचायत समितियों के लिए अध्यक्ष, उपाध्यक्ष, अध्यक्ष और उपाध्यक्ष पद शामिल हैं। पहली बैठकें अंतिम तिथि से पहले होनी चाहिए।

Web Title : Zilla Parishad, Panchayat Samiti Elections Before March 2026: Orders Issued

Web Summary : Gram Vikas Vibhag directs district collectors to hold Zilla Parishad and Panchayat Samiti elections by March 20, 2026. Includes president, vice-president, chairman, and vice-chairman posts for twelve Zilla Parishads and 125 Panchayat Samitis. First meetings must be held before the deadline.