शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बिंदूनामावली तपासून घेण्यासाठी अंतिम नोटीस; शाळांची मान्यता काढून घेण्याची शिक्षण विभागाची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 14:49 IST

सोलापूर : जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांनी बिंदूनामावली (रोस्टर ) तपासून घ्या अन्यथा शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल,  असा इशारा ...

ठळक मुद्देशिक्षण संस्थांमध्ये बिंदू नामावली तपासून घेण्याबाबत उदासीनतातपासणी करून मंजुरी घेतल्याशिवाय शिक्षक भरती करता येणार नाही़ शेवटच्या दिवशी शाळांनी गर्दी केली आहे़ ७२ संस्थांनी तपासणीसाठी प्रस्ताव दिले

सोलापूर : जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांनी बिंदूनामावली (रोस्टर ) तपासून घ्या अन्यथा शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल,  असा इशारा देणारी अंतिम नोटीस माध्यमिक विभागाने शाळांना दिली आहे.

राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये होणारी शिक्षकांची भरती शासनाने बंद ठेवली आहे. लवकरच ही भरती करण्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी भरतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यापूर्वी शाळांनी आपल्या शिक्षण संस्थेची बिंदूनामावली (रोस्टर) तपासून घेणे बंधनकारक आहे. याबाबत शिक्षण विभागाने अनेकवेळा शाळांना नोटीस बजावली,  परंतु शिक्षकांची भरती होत नाही तर रोस्टर तपासून उपयोग काय असा सवाल शिक्षण क्षेत्रातून विचारला जात होता. आता लवकरच ही भरती होणार असल्याने शाळातील रिक्त पदे रोस्टर तपासल्यानंतर स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने अनुदानित माध्यमिक शाळांना रोस्टर तपासून घेण्याची तंबी दिली आहे.

बिगर अल्पसंख्याक अनुदानित शाळेतील शिक्षकांची पदे रिक्त आहेत. या जागा तातडीने भरण्याची प्रक्रिया शासन स्तरावर लवकरच हाती घेतली जाणार आहे. शाळांनी पुणे येथील मागासवर्ग कक्ष, विधान भवन कार्यालयातून रोस्टर तपासून घेण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.  सूचना देताना रोस्टर अपूर्ण ठेवणे ही बाब गंभीर असल्याचे अधोरेखित करताना अंतिम नोटीस देत असल्याचे नमूद केले आहे. 

पोर्टलवर माहितीची सक्तीबिंदूनामावली (रोस्टर)ची तपासणी मागासवर्ग कक्ष,  पुणे येथून करावी आणि ही माहिती शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवर भरावी़ ज्या शाळा अशी माहिती भरणार नाहीत त्या शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल,  असा सक्त इशारा माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाºयांनी जिल्ह्यातील शाळांना दिला आहे.

शिक्षण संस्थांमध्ये बिंदू नामावली तपासून घेण्याबाबत उदासीनता आहे़ तपासणी करून मंजुरी घेतल्याशिवाय शिक्षक भरती करता येणार नाही़ शिक्षण संस्थांना ही संधी आहे़ गेले पाच दिवस पुण्यात हा कार्यक्रम सुरू आहे़ आज शेवटच्या दिवशी शाळांनी गर्दी केली आहे़ ७२ संस्थांनी तपासणीसाठी प्रस्ताव दिले आहेत़ - सूर्यकांत पाटील,शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सोलापूऱ

टॅग्स :SolapurसोलापूरTeacherशिक्षकEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा