शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

जेसीबीच्या बकेटमधून गुलाल उधळणाऱ्या उपसभापतीविरुध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 21:59 IST

ओझेवाडीत राजश्री भोसले यांची मिरवणूक; ७६ जणांवर गुन्हा दाखल

पंढरपूर : पंढरपूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राजश्री भोसले यांची निवड झाली अन् जेसीबीच्या बकेटमध्ये उभारून मिरवणूक काढल्याची सोशल मिडियावर व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. अन् पोलीस निरीक्षक किरण आवचार यांनी तत्काळ ७६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सध्या देशभरात कोरोना विषाणुचा संसर्ग प्रादुर्भाव सुरू आहे. तो रोखण्यासाठी लोकांना एकत्र जमुन यात्रा, उत्सव, ऊरूस व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

३ मार्च राजश्री पंडीत भोसले (रा. ओझेवाडी, ता. पंढरपूर) यांची पंचायत समिती पंढरपूर उपसभापतीपदी निवड झाली. म्हणुन त्यांनी ओझेवाडी येथील मारूती मंदिरासमोरील मोकळया जागेत जेसीबीच्या बकेटमध्ये उभारून गुलाल उधळुण ३ मार्च रोजी रात्री साडे सात ते साडे नऊच्या दरम्यान मिरवणुक काढली. 

या मिरवणुकीत राजश्री पंडीत भोसले त्यांचे पती पंडीत बाबुराव भोसले व त्यांचे सोबतचे समर्थक कार्यकर्ते अनिता पंडीत गायकवाड, रमेश गंगाराम क्षिरसागर,  राहुल शिवाजी गायकवाड, राजेंद्र ताय्याप्पा पवार, रमेश लक्ष्मण आदमाने, शिवाजी पोपट नवले, रोहित राजेंद्र पवार,  नागनाथ विठोबा शिंदे, बाळासाहेब महादेव शिंदे, आण्णासो बाळासो गायकवाड, बाळासो तुकाराम गायकवाड,  रमेश मधुकर गायकवाड, रामचंद्र श्रिरंग गायकवाड, लक्ष्मण श्रिरंग गायकवाड, संतोश दत्तात्रय गायकवाड, शिवाजी साहेबराव गायकवाड, प्रशांत चांगदेव शिंदे, शिवाजी रामचंद्र भोसले, कुलभुशन नागनाथ महामुणी, नवनाथ कुडलिंक शिंदे, अजित राजेंद्र पवार, महादेव श्रीमंत गायकवाड, बंडु मच्छिद्र क्षिरसागर, दत्तात्रय साहेबरावगायकवाड, मारूती श्रीरंग गायकवाड, रोहित राजेंद्र पवार, राहुल शिवाजी गायकवाड, विकास रामचंद्रकदम, बाळकृश्ण बाळासो गायकवाड, वैभव रामचंद्र कदम, सोमनाथ ज्ञानेष्वर क्षिरसागर, राजेंद्र धर्मराज शिंदे, बाबा नामदे, ज्योर्तिलिंग बापु गायकवाड सर्व (रा. ओझेवाडी ता. पंढरपूर व इतर ३० ते ४० लोक) हे सहभागी होते.

या लोकांनी बेकायदेशीर जमाव जमवुन राजश्री पंडीत भोसले रा. ओझेवाडी ता. पंढरपूर यांची पंचायत समिती पंढरपूर उपसभापती पदी निवड झाल्याने जेसीबीला असलेल्या समोरील बाजूच्या बकेटमध्ये उभारून गुलाल उधळुण मिरवणुक काढली आहे. याची क्लिप टिव्ही वर व सोशल मिडीयावर व्हायरल झाली.

त्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेसाठी शासनाचे उपाययोजनेमध्ये व्यत्यय आणुन जिवीतास धोका असलेल्या कोरोना रोगांचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली हयगयीची कृती केलेली आहे. म्हणुन पोना. गजानन माळी यांनी वरील सर्वां विरूध्द भादवि कलम २६९,२७०, १८८, १४३ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब), महाराश्ट्र पोलीस अधिनियम १३५, भारतीय साथरोग प्रतिबंधक कायदा १८५७ चे कलम २ व ३ प्रमाणे सरकार तर्फे फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोहेका. विक्रम काळे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या