Filed a case against the deputy speaker for throwing gulal out of JCB's bucket | जेसीबीच्या बकेटमधून गुलाल उधळणाऱ्या उपसभापतीविरुध्द गुन्हा दाखल

जेसीबीच्या बकेटमधून गुलाल उधळणाऱ्या उपसभापतीविरुध्द गुन्हा दाखल

पंढरपूर : पंढरपूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राजश्री भोसले यांची निवड झाली अन् जेसीबीच्या बकेटमध्ये उभारून मिरवणूक काढल्याची सोशल मिडियावर व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. अन् पोलीस निरीक्षक किरण आवचार यांनी तत्काळ ७६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सध्या देशभरात कोरोना विषाणुचा संसर्ग प्रादुर्भाव सुरू आहे. तो रोखण्यासाठी लोकांना एकत्र जमुन यात्रा, उत्सव, ऊरूस व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

३ मार्च राजश्री पंडीत भोसले (रा. ओझेवाडी, ता. पंढरपूर) यांची पंचायत समिती पंढरपूर उपसभापतीपदी निवड झाली. म्हणुन त्यांनी ओझेवाडी येथील मारूती मंदिरासमोरील मोकळया जागेत जेसीबीच्या बकेटमध्ये उभारून गुलाल उधळुण ३ मार्च रोजी रात्री साडे सात ते साडे नऊच्या दरम्यान मिरवणुक काढली. 

या मिरवणुकीत राजश्री पंडीत भोसले त्यांचे पती पंडीत बाबुराव भोसले व त्यांचे सोबतचे समर्थक कार्यकर्ते अनिता पंडीत गायकवाड, रमेश गंगाराम क्षिरसागर,  राहुल शिवाजी गायकवाड, राजेंद्र ताय्याप्पा पवार, रमेश लक्ष्मण आदमाने, शिवाजी पोपट नवले, रोहित राजेंद्र पवार,  नागनाथ विठोबा शिंदे, बाळासाहेब महादेव शिंदे, आण्णासो बाळासो गायकवाड, बाळासो तुकाराम गायकवाड,  रमेश मधुकर गायकवाड, रामचंद्र श्रिरंग गायकवाड, लक्ष्मण श्रिरंग गायकवाड, संतोश दत्तात्रय गायकवाड, शिवाजी साहेबराव गायकवाड, प्रशांत चांगदेव शिंदे, शिवाजी रामचंद्र भोसले, कुलभुशन नागनाथ महामुणी, नवनाथ कुडलिंक शिंदे, अजित राजेंद्र पवार, महादेव श्रीमंत गायकवाड, बंडु मच्छिद्र क्षिरसागर, दत्तात्रय साहेबराव
गायकवाड, मारूती श्रीरंग गायकवाड, रोहित राजेंद्र पवार, राहुल शिवाजी गायकवाड, विकास रामचंद्र
कदम, बाळकृश्ण बाळासो गायकवाड, वैभव रामचंद्र कदम, सोमनाथ ज्ञानेष्वर क्षिरसागर, राजेंद्र धर्मराज शिंदे, बाबा नामदे, ज्योर्तिलिंग बापु गायकवाड सर्व (रा. ओझेवाडी ता. पंढरपूर व इतर ३० ते ४० लोक) हे सहभागी होते.

या लोकांनी बेकायदेशीर जमाव जमवुन राजश्री पंडीत भोसले रा. ओझेवाडी ता. पंढरपूर यांची पंचायत समिती पंढरपूर उपसभापती पदी निवड झाल्याने जेसीबीला असलेल्या समोरील बाजूच्या बकेटमध्ये उभारून गुलाल उधळुण मिरवणुक काढली आहे. याची क्लिप टिव्ही वर व सोशल मिडीयावर व्हायरल झाली.

त्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणेसाठी शासनाचे उपाययोजनेमध्ये व्यत्यय आणुन जिवीतास धोका असलेल्या कोरोना रोगांचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली हयगयीची कृती केलेली आहे. म्हणुन पोना. गजानन माळी यांनी वरील सर्वां विरूध्द भादवि कलम २६९,२७०, १८८, १४३ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब), महाराश्ट्र पोलीस अधिनियम १३५, भारतीय साथरोग प्रतिबंधक कायदा १८५७ चे कलम २ व ३ प्रमाणे सरकार तर्फे फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोहेका. विक्रम काळे करीत आहेत.

Web Title: Filed a case against the deputy speaker for throwing gulal out of JCB's bucket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.