सोलापूर जिल्ह्यातील पन्नास टक्के अंगणवाड्यांमध्ये नाही पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 01:05 PM2020-11-13T13:05:19+5:302020-11-13T13:07:54+5:30

शासनाच्या योजना कागदावरच: भाड्याच्या इमारतीचे काय करायचे

Fifty percent of Anganwadas in Solapur district have no water supply | सोलापूर जिल्ह्यातील पन्नास टक्के अंगणवाड्यांमध्ये नाही पाण्याची सोय

सोलापूर जिल्ह्यातील पन्नास टक्के अंगणवाड्यांमध्ये नाही पाण्याची सोय

googlenewsNext
ठळक मुद्देशासनाच्या आदेशानुसार अंगणवाड्यांच्या स्थितीची माहिती पाणीपुरवठा विभागाला सादर ग्रामविकास विभागाने प्रत्येक अंगणवाडीला नळकनेक्शन व स्वच्छतागृह बंधनकारक केले आहेकोरोना साथीमुळे कामकाज बंद असले तरी आगामी काळात पाण्याची गरज भासणार

सोलापूर: शंभर दिवसांत अंगणवाड्यांना नळकनेक्शन देण्याचे शासनाचे आदेश असताना जिल्ह्यातील पन्नास टक्के अंगणवाड्या तहानलेल्या असल्याचे दिसून आले आहे. कोरोना साथीमुळे कामकाज बंद असले तरी आगामी काळात पाण्याची गरज भासणार आहे.

ग्रामविकास विभागाने प्रत्येक अंगणवाडीला नळकनेक्शन व स्वच्छतागृह बंधनकारक केले आहे. शंभर दिवसांत अंगणवाड्यांना नळकनेक्शन द्या व त्यासाठी प्रत्येक कनेक्शनला दहा हजारांची तरतूद सुचविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने अंगणवाड्यांची माहिती पाणीपुरवठा विभागाला सादर केली आहे. कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी सर्वेक्षण सुरू असल्याचे म्हटले आहे.

जिल्ह्यातील निम्म्या अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे. बऱ्याच अंगणवाड्या जिल्हा परिषदेच्या शाळेत, ग्रामपंचायतीत आणि समाज मंदिरात भरत आहेत. या अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारतीची प्रतीक्षा आहे. अस्तित्वात असलेल्या काही इमारतींची दुरुस्ती आवश्यक आहे. भाड्याने भरत असलेल्या अंगणवाड्या सेविकांच्या जागेत आहेत. त्यांना महिन्याला एक हजार भाडे दिले जात आहे.

कनेक्शनची आहे अडचण

जिल्ह्यातील पन्नास टक्के अंगणवाडी केंद्रात पाण्याची सोय नाही. तसेच ४७ गावांत अद्याप नळपाणीपुरवठा योजना नाही. समाज मंदिर, ग्रामपंचायत, भाड्याच्या इमारतीत कनेक्शन कसे द्यायचे, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन निर्णय घेतला जाईल, असे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले.

अंगणवाड्यांची स्थिती

  • एकूण मंजूर : ४२११
  • स्वत:ची इमारत : २६४४
  • झेडपी शाळेत : ६२१
  • ग्रामपंचायतीत : २७५
  • समाज मंदिरात : १७९
  • भाड्याची इामारत : ३९

शासनाच्या आदेशानुसार अंगणवाड्यांच्या स्थितीची माहिती पाणीपुरवठा विभागाला सादर केली आहे. त्यामुळे या विभागाकडून आता नळकनेक्शनची पूर्तत: होणे अपेक्षित आहे.

जावेद शेख, महिला बालकल्याण अधिकारी  

Web Title: Fifty percent of Anganwadas in Solapur district have no water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.