सिद्धेश्वर कारखान्याशेजारी असलेल्या पुटा कारखान्याला भीषण आग

By Appasaheb.patil | Updated: April 23, 2023 13:25 IST2023-04-23T13:24:34+5:302023-04-23T13:25:18+5:30

अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल

Fierce fire at Puta factory adjacent to Siddheshwar factory | सिद्धेश्वर कारखान्याशेजारी असलेल्या पुटा कारखान्याला भीषण आग

सिद्धेश्वर कारखान्याशेजारी असलेल्या पुटा कारखान्याला भीषण आग

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना, कुमठे (ता. उ. सोलापूर) येथील पुटा कारखान्याला रविवारी सकाळच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती समजताच सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पाण्याचा मारा केल्यानंतर तासाभरानंतर आग आटोक्यात आली.

सध्या सिध्देश्वर साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपला आहे. कारखान्याशेजारीच पुटा कारखाना आहे. या कारखान्यात शेकडो टनाचे पुटे ठेवण्यात आले होते. अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत हजारो रूपयांचे पुटे जळून खाक झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कारखान्यातील कर्मचारी, अधिकारी यांनीही मोठी मेहनत घेतली. आग भडकू नये यासाठी कर्मचारी यांनी उर्वरित पुटे बाजूला केले. आगीचे लोळ परिसरात मोठया प्रमाणात पसरले होते. त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी अग्निशामक दलासोबतच कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Fierce fire at Puta factory adjacent to Siddheshwar factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.