शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बंधाºयावरील पाणी अडवण्यासाठी आता फायबरची दारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 13:25 IST

कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयावर पाणी अडवण्यासाठी लोखंडी दरांना पर्याय म्हणून नव्या तंत्रज्ञानाचे फायबरची दारे वापरता येतात अशी माहिती सोलापुरातील उद्योजक सूर्या मल्टी प्रॉडक्टचे  दत्ताअण्णा सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देफायबरच्या दारांची तपासणी शासनाच्या नाशिक येथील मेरी संस्थेकडून सूर्या मल्टी प्रॉडक्ट इपोंर्ट एक्स्पोर्टच्या माध्यमातून विविध देशात पाहणी

सोलापूर: कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयावर पाणी अडवण्यासाठी लोखंडी दरांना पर्याय म्हणून नव्या तंत्रज्ञानाचे फायबरची दारे वापरता येतात अशी माहिती सोलापुरातील उद्योजक सूर्या मल्टी प्रॉडक्टचे  दत्ताअण्णा सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या फायबरच्या    दारांची तपासणी शासनाच्या नाशिक येथील मेरी संस्थेकडून करवून घेऊन तसे प्रमाणपत्रही घेण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

    नदीमधून वाहणारे पाणी गावोगावी थांबावे त्यातून सिंचन क्षेत्र वाढावे आणि शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आणि त्या बंधाºयावर पाणी अडवण्यासाठी लोखंडी प्लेट म्हणजेच चॅनल निडलचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येतो, परंतु पाण्यात लोखंड जास्त काळ टिकत नाही.  लोखंडी निडलमध्ये पाणी फार काळ टिकत नाही त्याचबरोबर चॅनल निडलला गंज किंवा त्याची चोरी होणे यातून सरकारला मोठे आर्थिक नुकसान तर होतेच त्याचबरोबर पाणी वाहून गेल्याने शेतकºयांचेही मोठे नुकसान होते. 

शासनस्तरावर शेतकºयांसाठी बांधण्यात येणारे बंधारे आणि त्यांचा उद्देश सफल होत नाही म्हणूनच या सर्व समस्यांवर उपाय म्हणून नवे तंत्रज्ञान वापरून बंधाºयावर पाणी अडवण्यासाठी कायमस्वरूपी टिकेल असे फायबरचे दरवाजे तयार करता येतील का याचा विचार केला आणि त्यानुसार सूर्या मल्टी प्रॉडक्ट इपोंर्ट एक्स्पोर्टच्या माध्यमातून विविध देशात पाहणी करण्यात आली त्यातून जर्मनी येथून फायबर निडलचे तंत्रज्ञान आणले जे अमेरिकेच्या स्टँर्डडप्रमाणे आहे. त्यानंतर दक्षिण कोरियातील सेऊलमध्ये हे नवे तंत्रज्ञान विकसित करून तेथेच तयार करण्यात आले.

आता सध्या त्याचा वापर आपल्या देशातील बंधाºयासाठी पर्यायाने शेतकºयांच्या हितासाठी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. त्यामुळे परिसरातील सिंचनक्षेत्र वाढून शेतकरी समृद्ध होण्यास मदत झाली असेही दत्ताअण्णा सुरवसे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राजकुमार सुरवसे उपस्थित होते.

३५0 फायबर निडल बसविले...- सोलापूर जिल्ह्यातील तिºहे, अर्जुनसोंड आणि शिंगोली येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयावर ३५0 फायबर निडल बसवण्यात आले आहेत. फायबर निडल बंधाºयावर बसवल्यानंतर या निडलमधील जोडणीमधून पाणी गळती होऊन पुढे वाहून गेले नाही. बंधाºयावर ५ मीटरपर्यंत पाणी थांबल्याने पाण्याची साठवण मोठ्या प्रमाणात झाली. पूर्वी पाणी सोडल्यानंतर अवघ्या काही दिवसातच पाणी वाहून जात होते, परंतु फायबरचे निडल बसवल्यानंतर तीन-तीन महिने पाणी बंधाºयात साठून राहू लागले असल्याचे दत्ताअण्णा सुरवसे यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई