शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

माहेरातील प्रेमप्रकरण समजेल या भीतीने चिमुरड्याला संपवून आत्महत्येचा प्रयत्न

By काशिनाथ वाघमारे | Updated: March 22, 2024 17:30 IST

प्रणव गणेश चोपडे (वय ६) असे खून झालेल्या चिमुरड्याचे नाव असून, त्याचे आजोबा नारायण चोपडे यांनी याबाबत फिर्याद दिली होती.

सोलापूर : माढा तालुक्यात कव्हे येथे सहा वर्षीय चिमुरड्याचा २६ फेब्रुवारी २०२४ रोजी खून झाला होता. यानंतर तिच्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलाच्या आईवरील उपचार पूर्ण होताच पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची कोठडी मिळाली. माहेरातील प्रेमप्रकरण सासरी समजेल आणि पुढे मुलालाही त्रास होईल या भीतीने चिमुरड्याचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रणव गणेश चोपडे (वय ६) असे खून झालेल्या चिमुरड्याचे नाव असून, त्याचे आजोबा नारायण चोपडे यांनी याबाबत फिर्याद दिली होती. याप्रकरणी मुलाची आई आरोपी कौशल्या गणेश चोपडे हिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहेरातील प्रेम प्रकरण सासू, सासऱ्यांना कळते की काय? या विचाराने ती कायम बैचेन होती. त्यामुळे ती आत्महत्येच्या विचारात होती. सन २०२२ मध्येही तिच्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला होता. मात्र कुटुंबाने खासगी डॉक्टरांकडून उपचार करून गोळ्या सुरू ठेवल्या होत्या. त्याचबरोबर पती-पत्नींमध्येही काही कारणास्तव कधीकधी भांडणे होत होती.

घटनेच्या दिवशी प्रथमत: तिने 'टीव्ही पाहतो काय?' म्हणत लहान मुलाचा गळा आवळला. नंतर तो मरण पावला की नाही याची खात्री करण्यासाठी त्याला हलवून पाहिले. परंतु आपण आत्महत्या केल्यानंतर मुलगा नाहीच मेला तर? असा विचार करून गळा आवळल्यानंतर तिने कुऱ्हाडीने त्याचे शीर धडावेगळे केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यानंतर तिने स्वतःही गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी झाला. त्यामुळे तिने लागलीच दीड ग्लास तणनाशक औषधाचे प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी