शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

 सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीच्या ‘यलो’ यादीतील शेतकरी ‘रेड’मध्ये, कर्जमाफीसाठी पात्र झाले ३,२२४ शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 4:27 PM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आॅनलाईन अर्ज भरलेल्यांपैकी ६ हजार ९१६ शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र झाले आहेत. जिल्हा बँकेला आलेल्या ११ हजार १४० ‘यलो’ यादीतील हे शेतकरी तपासणीत ‘रेड’ यादीत गेले आहेत.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकºयांची कर्जमाफीअपात्र ठरलेल्यांमध्ये बार्शीचे २ हजार ७३, सांगोल्याचे १ हजार ९२७, मोहोळचे १ हजार ६४४, करमाळ्याचे ७०२, माढ्याचे ३४०, दक्षिणचे १२७, माळशिरसचे ८०, उत्तरचे १६ व मंगळवेढ्याच्या ४ शेतकºयांचा समावेश जिल्हा बँकेला आलेल्या ‘ग्रीन’ यादीतील ९५ हजार १७९ शेतकºयांपैकी तपासणीत ६६ हजार ८०९ शेतकरी कर्जमाफीला पात्र झाले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३० : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत आॅनलाईन अर्ज भरलेल्यांपैकी ६ हजार ९१६ शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र झाले आहेत. जिल्हा बँकेला आलेल्या ११ हजार १४० ‘यलो’ यादीतील हे शेतकरी तपासणीत ‘रेड’ यादीत गेले आहेत.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकºयांची कर्जमाफी होत आहे. सोलापूर जिल्हा बँकेला ११ हजार १४० शेतकºयांची ‘यलो’ यादी आली होती. ती बँकेने तपासणीसाठी विकास सोसायट्यांकडे दिली होती. सोसायट्यांचे सचिव, बँकेच्या अधिकाºयांनी केलेल्या तपासणीत ३२२४ शेतकरी कर्जमाफीला पात्र झाले आहेत. ही पात्र शेतकºयांची यादी शासनाला आॅनलाईन पाठवली असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. तपासणीत निकषात न बसणारे ६ हजार ९१६ शेतकरी निघाले आहेत. शासनाने निकष लावल्याने या अपात्र शेतकºयांची नावे कर्जमाफीतून कायमची बाहेर पडली आहेत. शासनाने दिलेल्या निकषानुसार ‘यलो’ यादी तपासणीनंतर हे शेतकरी ‘रेड’ यादीत आले आहेत. जिल्हा बँकेला आलेल्या ‘ग्रीन’ यादीतील ९५ हजार १७९ शेतकºयांपैकी तपासणीत ६६ हजार ८०९ शेतकरी कर्जमाफीला पात्र झाले असून त्रुटी निघालेल्या २८ हजार ३७० शेतकºयांची अचूक यादी शासनाला फेरसादर केली आहे. याशिवाय ४७ हजार ११ शेतकºयांची ‘मिसमॅच’यादी तपासणीसाठी गावपातळीवर पाठवली असून यावर तालुका समिती निर्णय घेणार आहे. -------------------अक्कलकोटचे सर्व शेतकरी पात्र - जिल्हा मध्यवर्ती बँकेला आलेल्या १० हजार १४० शेतकºयांच्या यादीच्या तपासणीत माढ्याचे ९४७, पंढरपूरचे ५४५, सांगोल्याचे ३२९, करमाळ्याचे ३२०, मोहोळचे २९८, माळशिरसचे २२०, अक्कलकोटचे २१७, दक्षिणचे १८५, मंगळवेढ्याचे ७२, बार्शीचे ३८ व उत्तर तालुक्यातील ५६ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले. - अपात्र ठरलेल्यांमध्ये बार्शीचे २ हजार ७३, सांगोल्याचे १ हजार ९२७, मोहोळचे १ हजार ६४४, करमाळ्याचे ७०२, माढ्याचे ३४०, दक्षिणचे १२७, माळशिरसचे ८०, उत्तरचे १६ व मंगळवेढ्याच्या ४ शेतकºयांचा समावेश आहे. अक्कलकोटचा एकही शेतकरी अपात्र ठरला नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी