अंगावर खाज येणारी पावडर टाकून दीड लाख लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 13:12 IST2020-01-17T13:10:06+5:302020-01-17T13:12:12+5:30
पंढरपूर शहरातील घटना; चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

अंगावर खाज येणारी पावडर टाकून दीड लाख लांबविले
पंढरपूर : अंगावर खाज येण्याची पावडर टाकून शहरातील जुन्या एसटी स्टॅडसमोरील अखिलेश बंगल स्टोअर येथील अखिलेश यादव यांच्याकडील सुमारे दीड लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला.
अखिलेश यादव हे आपल्या दुकानातील रोकड बँकेत भरण्यासाठी जात असताना एक ठिकाणी मावा खाण्यासाठी थांबले होते. थांबलेल्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या अंगावर खाज येण्याची पावडर टाकली. खाज वाढल्याने ते पुन्हा आपल्या दुकाने गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या पिशवीतील दीड लाख रुपयांची रक्कम लंपास झाल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. शहर पोलीस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.