शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथे फटाका कारखान्यात स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 13:25 IST

मंगळवेढा तालुक्यातील घटना; जिवितहानी नाही, कारखाना सील असतानादेखील झाला स्फोट

ठळक मुद्दे सोमवारी सकाळच्या सुमारास ही स्फोटाची घटना घडल्याने परिसरात घबराट सोमवार सकाळी ८.४० मिनिटांपासून फटाक्यांच्या स्फोटाचा आवाज येण्यास सुरुवातफटाक्यांचे आवाज व धुराने परिसर व्यापून गेला

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावातील प्रशासनाने सील केलेल्या फटाक्याच्या कारखान्याच्या जवळ असणाºया कंपनीच्या कार्यालयात नमुने म्हणून ठेवण्यात आलेल्या फटाक्यांचा स्फोट झाल्याने खळबळ उडाली. सोमवारी सकाळच्या सुमारास ही स्फोटाची घटना घडल्याने परिसरात घबराट पसरली. दरम्यान प्रशासनाने उत्पादनावावर बंदी घातली असताना नियमांचे उल्लंघन करणाºया विरुद्ध गुन्हे दाखल करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

सोमवार सकाळी ८.४० मिनिटांपासून फटाक्यांच्या स्फोटाचा आवाज येण्यास सुरुवात झाली. फटाक्यांचे आवाज व धुराने परिसर व्यापून गेला. कारखाना सील असतानादेखील स्फोट झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी या कारखान्यात स्फोट झाले होते. भाळवणी ग्रामस्थांनी हा कारखाना बंद करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले होते, त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार याबाबत प्रांताधिकारी यांना सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार प्रांताधिकारी यांनी हा फटाक्यांचा कारखाना बंद करण्याबाबत अहवाल दिला होता़.

 त्यानुसार पोलीस प्रशासनाने कारखाना मालकास उत्पादन बंद करण्याबाबत नोटीस बजावली होती तसेच प्रशासनाने कारवाई करत कारखाना सील केला होता. मात्र सध्या जो फटाक्यांचा माल होता तो विविध नमुने म्हणून कार्यालयात ठेवलेले फटाके होते़ त्याचा स्फोट झाल्याबाबत माहिती उपलब्ध झाल्याची पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी सांगितले़ फटाक्यांच्या उत्पादनास बंदी असताना हे फटाके आले कोठून असा प्रश्न असून जर नमुने म्हणून ठेवण्यात आलेले फटाके असले तरी ते सुरक्षितस्थळी का ठेवण्यात आले नाहीत असा प्रश्न असून निष्काळजीपणा व प्रशासनाने दिलेले आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधित कारखाना मालकांवर गुन्हा दाखल केला जाईल असे पोलीस प्रशासनाने सांगितले.भाळवणी येथील फटाके कारखाना सील केला होता संबंधित मालकाला याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार उत्पादन करू नये याबाबत नोटीस दिली होती तरीही ही घटना घडली आहे याबाबत सविस्तर चौकशी करून संबंधित दोषी वर गुन्हे दाखल केले जातील-  दत्तात्रय पाटील,

उपविभागीय पोलिस अधिकारी, मंगळवेढा

टॅग्स :SolapurसोलापूरfireआगSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस