शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

यंदाही मणियार यांचा पुढाकार; यात्रेत लाईटिंग करणार फडकुले सभागृह-पार्क चौक मार्गावर दिव्यांचा झगमगाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 11:55 AM

सोलापुरातील पार्क चौकातील व्यापारी सरसावले : प्रकाशमय यात्रेत सर्वधर्मीय मंडळी होताहेत सहभागी

ठळक मुद्देगेल्या वर्षी ‘लोकमत’ची संकल्पना वीरशैव व्हिजनने सत्यात उतरवलीप्रकाशमय यात्रेमुळे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला पुनर्वैभव आले ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिराबरोबर सोलापूरचे ब्रँडिंग होण्यासाठी ‘लोकमत’ची धडपड

सोलापूर : जसं लग्नकार्य म्हटलं की घरांवर विद्युत रोषणाई करतो, अगदी तसंच ‘सिद्धरामा की शादी है’ म्हणत गेल्या वर्षी घरांवर विद्युत रोषणाई करणारे बाळी वेस येथील व्यापारी समीर मणियार यांना वीरशैव व्हिजनच्या पदाधिकाºयांनी बुधवारी थेट संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘सिद्धरामा की शादी है, लाईटिंग तो जरुर होगी’ असे म्हणत इतरांनाही प्रकाशमय यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले. 

गेल्या वर्षी समीर मणियार आणि परिवारातील सदस्य प्रकाशमय यात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी संपूर्ण इमारत लख-लख दिव्यांनी झळाळून टाकली होती. घरात कुठले लग्नकार्य किंवा इतर कुठलाही कार्यक्रम नसताना नातेवाईक, मित्र परिवार आणि परिसरातील व्यापाºयांनी त्यांना प्रश्न केला होता. त्यावेळी समीर मणियार यांनी सिद्धरामांच्या यात्रेचा संदर्भ देत लाईटिंग केल्याचे सांगत आश्चर्याचा धक्का दिला होता. यंदा करतील की नाही, अशी शंका मनात घेऊन व्हिजनच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली असता ते म्हणाले, ‘शादी तो सिद्धरामा की है, लाईटिंग तो जरूर होगी !’

पार्क चौक व्यापारी असोसिएशननेही डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह ते पार्क चौक (जिमखाना) हा मार्ग विद्युत दिव्यांनी लख-लख केला होता. यंदाही हा मार्ग आकर्षक दिव्यांनी उजळून टाकणार असल्याचा निर्णय असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला. इतर व्यापारी संघटनाही प्रकाशमय यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष केतनभाई शहा यांनी केले. या मार्गावर नंदीध्वज मिरवणुकीचे स्वागतही करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीस सदस्य उमेश ऐनापुरे, सुरेंद्र जोशी, श्याम क्षीरसागर, रमाकांत जन्नू आदी उपस्थित होते. 

प्रकाशमय यात्रेत मधला मारुती व्यापारी असोसिएशनही सहभाग नोंदवला असून, मधला मारुती ते माणिक चौक मार्गावर विद्युत माळा सोडण्यात येणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धेश्वर बमणी यांनी सांगितले. यावेळी प्रकाश बिराजदार, प्रकाश मलजी, सिद्धेश्वर सास्तुर, रवी ओनामे, मनोज फताटे, बसवराज बटगेरी, बसवराज अष्टगी  आदी उपस्थित होते. अन्य सेवाभावी संस्था, बँका, व्यापारी लाईटिंग करण्याचे बोलून दाखवत आहेत. 

राजवाडे चौक-दत्त चौक मार्ग प्रकाशमय- झुंजे- शहरातील राजवाडे चौक ते दत्त चौक हा मार्ग नंदीध्वज मिरवणुकीचा प्रमुख मार्ग आहे. हा मार्ग गेल्या वर्षीही विद्युत माळा सोडून उजळून टाकण्याचे काम स्वराज प्रतिष्ठानने केले होते. यंदाही गेल्या वर्षीपेक्षा आकर्षक विद्युत दिव्यांनी उजळवून टाकणार असल्याचे अध्यक्ष शिवराज झुंजे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मार्ग प्रकाशमय करण्यासाठी रोहित इंगळे, महेश काटकर, सचिन कुमठेकर, गुरू माशाळकर, वैभव नरखेडकर आदी परिश्रम घेत आहेत. 

ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिराबरोबर सोलापूरचे ब्रँडिंग होण्यासाठी ‘लोकमत’ची धडपड पाहावयास मिळत आहे. सोलापूरच्या ब्रँडिंगसाठी यंदाही पार्क चौक व्यापारी असोसिएशनच्या वतीने  डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह  ते पार्क चौक जिमखान्यापर्यंतच्या दुतर्फा विद्युत माळा सोडण्यात येणार आहेत.-केतनभाई शहा,अध्यक्ष- पार्क चौक व्यापारी असोसिएशन.

प्रकाशमय यात्रेमुळे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला पुनर्वैभव आले आहे. ३०-३५ वर्षांपूर्वीची परंपरा पुन्हा सुरू झाली आहे, याचा विशेष आनंद आहे. ऐतिहासिक मेकॅनिकी चौक विद्युत दिव्यांनी झळाळून सोडणार आहे. शिवाय स्वागत कमान उभी करण्याचा विचार आहे. यासाठी आझाद हिंद नवरात्र मंडळाचे ट्रस्टी, पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत आहेत. -शशिकांत पाटील,ट्रस्टी- आझाद हिंद नवरात्र मंडळ. 

पूर्वी बाळी वेस, चाटी गल्ली या नंदीध्वज मिरवणूक मार्गावर व्यापारी आपल्या दुकानांवर लाईटिंग करायचे. त्यात खंड पडला होता. मात्र गेल्या वर्षापासून ‘लोकमत’च्या संकल्पनेतून अन् वीरशैव व्हिजनच्या पुढाकारातून प्रकाशमय यात्रेची परंपरा पुन्हा सुरू झाली. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मी माझ्या घराची इमारत आकर्षक विद्युत दिव्यांनी उजळून टाकणार आहे.-समीर मणियार, व्यापारी- बाळी वेस.

गेल्या वर्षी ‘लोकमत’ची संकल्पना वीरशैव व्हिजनने सत्यात उतरवली. सर्वच घटकांमधील भक्तगण, व्यापारी या संकल्पनेचे स्वागत करीत प्रकाशमय यात्रेत सहभागी झाले. पूर्वी जशी यात्रा प्रकाशात साजरी व्हायची, तशी यात्रा पाहावयास मिळाली. यंदा मधला मारुती ते माणिक चौक या  रस्त्याच्या दुतर्फा विद्युत माळा सोडून नंदीध्वज मार्ग प्रकाशमय करण्यात येणार आहे.-सिद्धेश्वर बमणी,अध्यक्ष- मधला मारुती व्यापारी असोसिएशन.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Siddheshwar Yatraसोलापूर सिद्धेश्वर यात्रा