शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

लॉकडाऊन काळातही बोलण्यासाठी धडपडताहेत कर्णबधिर बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:03 IST

मुकेपणा निर्मूलन कार्यक्रम; बोलवाडी प्रकल्पात ऑनलाइन उपक्रम सुरू

ठळक मुद्देपालकांनी पुढाकार घेऊन सर्व पालकांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. या ग्रुपवर पालक घरीच व्हिडीओ तयार करून एकमेकांना पाठवत आहेतव्हिडीओ पाहून परस्परांना प्रोत्साहन देत आहेत तसेच दुरुस्त्या सुचवत आहेत

मोहोळ : ‘बोलवाडी’ प्रकल्प आणि ‘प्रिसीजन’ यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यात  सुरू असलेला ‘मुकेपणा निर्मूलन कार्यक्रम’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्याच्या संचारबंदी काळातही शेटफळ येथील बोलवाडीमध्ये ऑनलाइन सुरू आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील तब्बल २ लाख ८७ हजार बालकांची ‘ताटवाटी चाचणी’ घेऊन १४७ संशयास्पद कर्णबधिर बालके शोधली. 

मोहोळ आणि माढा तालुक्यातील आतापर्यंत त्यातील २१ बालकांच्या कानाच्या ‘बेरा’ चाचण्या केल्या. या बालकांना श्रवणयंत्रे लावून प्रत्यक्ष बोलण्याचे प्रशिक्षण सुरू झाले; मात्र बालक व पालकांना प्रवास करता येत नसल्यामुळे अडचण निर्माण झाली  होती.  परंतु कोळेगाव येथील पालक प्रतिनिधी नामदेव मल्लाव यांनी या उपक्रमात पुढाकार घेऊन सर्व पालकांना आपल्या पाल्यांच्या भाषा बोलायला शिकवण्यासाठी प्रेरित केले.

जिल्ह्यातील इतर  बालकांच्या कानाच्या तपासण्या सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू झाल्या होत्या. लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाल्याने ‘बेरा’ तपासणीचे  काम सध्या स्थगित आहे. तरीही ठरलेल्या उद्दिष्टानुसार मोहोळ आणि माढा तालुक्यातील बेरा चाचणी झालेल्या बालकांना श्रवणयंत्रे लावली आहेत. लॉकडाऊनपूर्वी या बालकांच्या पालकांचीही कार्यशाळा घेतली आहे. 

लॉकडाऊनमुळे पालकांना शेटफळ येथे  येण्यास अडचणी येत होत्या; मात्र काही पालकांनी पुढाकार घेऊन सर्व पालकांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर पालक घरीच व्हिडीओ तयार करून एकमेकांना पाठवत आहेत. हे व्हिडीओ पाहून परस्परांना प्रोत्साहन देत आहेत तसेच दुरुस्त्या सुचवत आहेत. याशिवाय बोलवाडी प्रकल्पाच्या अध्यक्ष जयप्रदा भांगे या देखील सर्व पालकांना त्यांच्या पाल्याला घरीच बोलायला कसे शिकवावे याबाबत मार्गदर्शन करत आहेत.

बालकांना मदतीसाठी यांची धडपड ...- अनेक बालकांची श्रवणयंत्रे, श्रवण यंत्रांचे वायर्स, बॅटरी व इतर साधने नादुरुस्त झाल्याने व सोलापुरात प्रवेश बंदी असल्यामुळे अनंत अडचणी येत होत्या; मात्र बोलवाडी ग्रुपचे सोलापूर येथील सहकारी कृष्णात कोळी, अशोक पुजारी, डॉ. विनय चौधरी आणि शैलेश बच्चुवार यांनी सोलापूर येथून ही साधने हस्ते परहस्ते पालकांना पोहोच करून बालकांच्या ऐकण्याचा व बोलण्याचा मार्ग सोपा केला.

कर्णबधिर बालकांचे ऐकणे व बोलणे यात कधीही खंड पडू द्यायचा नाही म्हणून असा ऑनलाइन उपक्रम सुरू आहे. या अशा बालकांचे कान खºया अर्थाने तयार करण्यासाठी त्यांच्याशी सतत बोलत राहणे महत्त्वाचे आहे. - जयप्रदा भांगे,बोलवाडी प्रकल्प, शेटफळ

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEducationशिक्षणSchoolशाळा