उपमुख्यमंत्र्यांनीही पूजेला येऊ नये!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2020 05:58 IST2020-11-22T05:58:12+5:302020-11-22T05:58:57+5:30
वारीसंदर्भात वारकरी संप्रदायाची भूमिका मांडण्यासाठी महाराज मंडळांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

उपमुख्यमंत्र्यांनीही पूजेला येऊ नये!
पंढरपूर : कार्तिकी यात्रेनिमित्त वारकऱ्यांना पंढरपुरात येण्यास शासनाने निर्बंध घातले. वारकऱ्यांना विरोध करत उपमुख्यमंत्री कार्तिकीची शासकीय महापूजा कसे करू शकतात. हा दुजाभाव शासनाने करू नये. वारकऱ्यांना वारी नाही तर उपमुख्यमंत्र्यांनीही वारी करू नये, असे आवाहन ह. भ. प. राणा महाराज वासकर यांनी केले आहे.
वारीसंदर्भात वारकरी संप्रदायाची भूमिका मांडण्यासाठी महाराज मंडळांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.