यातच खरे जीवनाचे सार आहे़..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 09:06 PM2020-01-03T21:06:27+5:302020-01-03T21:07:39+5:30

आपल्या जीवनयात्रेत आईवडिलांची छत्रछाया असणे म्हणजे खरोखर भाग्यवंत समजायला हवे.

This is the essence of real life ..! | यातच खरे जीवनाचे सार आहे़..!

यातच खरे जीवनाचे सार आहे़..!

Next

आपल्या जीवनयात्रेत आईवडिलांची छत्रछाया असणे म्हणजे खरोखर भाग्यवंत समजायला हवे. असं म्हटलं जातं की प्रत्येक जीवाच आयुष्य हे विधीलिखित असतं, जन्मार्पूर्विच ते लिहीलेलं असतं. मग त्यांत आपल्या प्रिय व्यक्तिचा सुद्धा समावेश असेल यात वावगं ते काय...? पण समोर असलेल्या त्या व्यक्तिला कोण व कसा पटवून सांगल..? आडमार्गाने जात असणाऱ्या यात्रीला योग्य मार्ग दाखवायला जसी दूताची गरज भासते, तशी गरज तर भासणार नाही ना..? असे विचित्र प्रश्न इवल्याश्या कोमल मनात घर करून उभे राहीले की एकच धास्ती लागते. ह्यदयाशी कवटाळलेलं प्रेम, माया, ममता उमगायला न काळाची न वेळेची गरज असते. माळी आपल्या बागेची नीगा काटेकोरपणे घेत असतो ,त्यांत न त्याचा स्वार्थ असतो नाही लोभ. फुलानी बहरत असलेली बाग पाहून माळ्याची मान देखिल छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताठ मानेची स्मरण करून देते. आपल्या सखाचा बहरत असलेला सुखी संसार पाहून प्रत्येक मित्राचा आनंद द्वीगुणीत नक्कीच होतो.. ह्यातच जीवनाचे सार आहे..

आजकाल घडत असलेल्या प्रत्येक घटनेचा विचार केला तर अस लक्षात येईल कि प्रत्येक घटनेचा परिणाम सगळ्यात जास्त तरुणाईवरच होतो. चांगला-वाईट दोन्ही प्रकारे. या तरुणाईचे मन नेहेमी अस्वस्थ, भांबावलेले, द्विधा मनस्थितीत असते.  शिक्षण क्षेत्राचा जर विचार केला तर या क्षेत्राबद्दल  तरुणाईच्या मनात मोठ्या प्रमाणात नैराश्य दिसून येते शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना भरमसाठ डोनेशन आणि फी भरावी लागते. पण शिक्षणाचा दर्जा अगदीच खालावलेला असतो. छोट्या शहरातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना हुशार असून सुद्धा योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे त्यांच्या हुशारीला योग्य दिशा मिळत नाही. शिक्षकांचेही योग्य मार्गदर्शन त्यांना मिळत नाही. पुस्तकी शिक्षण पद्धती आणि प्रात्यक्षिक-व्यवसायाभिमुख शिक्षणाचा अभाव यामुळे या तरुणाईला आपले भविष्य अंधकारमय दिसते.

  फक्त पुस्तकी अभ्यास शिकवण्यापेक्षा प्रात्यक्षिक स्वरुपात तरुणाईला अभ्यासाची ओळख करून दिली तर त्यांना त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होईल... साध उदाहरणच घ्यायचं म्हंटल तर शाळा-महाविद्यालयात आपल्याला संगणकाचे जे प्रशिक्षण दिले जाते त्याचा काहीच उपयोग आपल्याला पुढील आयुष्यात नोकरीच्या ठिकाणी होत नाही. प्रत्यक्षात प्रत्येक कंपनीचे,कार्यालयाचे,बँकांचे स्वत: चे वेगळे सोफ्टवेअर असते. त्याचे प्रशिक्षण कुठेच मिळत नाही.तसेच पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत सुद्धा घडते. प्रत्यक्ष पाठ वेगळा शिकतो आणि व्यवहार वेगळा असतो.

आजकाल घडत असलेल्या प्रत्येक घटनेचा विचार केला तर अस लक्षात येईल कि प्रत्येक घटनेचा परिणाम सगळ्यात जास्त तरुणाईवरच होतो. चांगला-वाईट दोन्ही प्रकारे. या तरुणाईचे मन नेहेमी अस्वस्थ, भांबावलेले, द्विधा मनस्थितीत असते.

- श्री़ गजानन पवार महाराज, सोलापूर

Web Title: This is the essence of real life ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.