सोलापुरात साकारलेल्या अश्वारुढ शिवमूर्तीची मध्यप्रदेशात प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 02:49 PM2019-12-30T14:49:18+5:302019-12-30T14:51:56+5:30

नितीन जाधव यांची शिल्पकला; तीन महिन्यांत तयार केली चौदा फुटी मूर्ती

Equestrian Shiva idol installed in Solapur in Madhya Pradesh | सोलापुरात साकारलेल्या अश्वारुढ शिवमूर्तीची मध्यप्रदेशात प्रतिष्ठापना

सोलापुरात साकारलेल्या अश्वारुढ शिवमूर्तीची मध्यप्रदेशात प्रतिष्ठापना

Next
ठळक मुद्देशिवाजी महाराजांची मूर्ती आपण बनवावे असे सर्वच मूर्तीकारांचे स्वप्न असते़ही मूर्ती बनवण्यासाठी तीन महिने लागलेमध्यप्रदेशात मूर्तीची प्रतिष्ठापना ही सोलापूरकरांना अभिमान

रुपेश हेळवे

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ही देशात नाही तर जगात पसरलेली आहे़ यामुळे शिवाजी महाराजांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा, यासाठी शिवाजी महाराजांची प्रतिमा देशभर प्रमुख ठिकाणी लावलेली दिसते़ असाच एक तेरा फुटी अश्वारुढी शिवाजी महाराजांची मूर्र्ती आता मध्यप्रदेश मध्ये बसवण्यात येणार आहे़ ही मूर्ती सोलापुरातील शिल्पकार नितीन जाधव यांनी तयार केली आहे.

मध्यप्रदेशमधील बुºहाणपूरमधील शहापूर नगरपालिकेमध्ये सोलापुरात तयार केलेली ही शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्यात येणार आहे़ ही मूर्ती तयार करण्यासाठी जाधव यांच्यासह चौघांनी तीन महिने परिश्रम घेतले़ ही मूर्ती अश्वारुढ असून, १३ फूट उंच, ५ फूट रुंद, लांबी १४ फूट आहे़ मूर्ती तयार करताना प्रथम मातीमध्ये तयार करून नंतर मोल्डिंग करण्यात आले़ यानंतर फायबरमध्ये ही मूर्ती तयार करण्यात आली.

तयार करण्यात आलेली मूर्ती अश्वारूढ असून, शिवाजी महाराज हे एका हाताने घोड्यावर लगाम लावत आहेत तर दुसºया हातामध्ये म्यानामध्ये असलेली तलवार आहे़ शिवाजी महाराजांचा घोडा  रुबाबदार असून घोडा धावता असून यावेळी घोड्याला लगाम लावल्यामुळे घोडा थांबला आणि  त्याच्या शरीरातील ताकद यावेळी दिसत आहे़ या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराज यांच्या हातामधील तलवार ही म्यानामध्ये आहे. कारण शिवाजी महाराजांकडे सैनिक असायचे़ प्रत्येक वेळी तलवार काढावी लागत नसे अशा स्वरूपाची रचना शहापूरच्या नगरपालिकेकडून सांगण्यात आली.

 यानुसारच ही मूर्ती तयार करण्यात आली आहे़ ही मूर्ती मध्यप्रदेशातील शहापूरमध्ये चौकात बसवण्यात येणार आहे़ याचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे़ ही मूर्ती बनवण्यासाठी शुभम पिपंळकर, रोहित साळुंखे, विनोद भोसले यांनी ही परिश्रम घेतले आहे़

खºया अर्थाने माझे स्वप्न पूर्ण झाले: नितीन जाधव
शिवाजी महाराजांची मूर्ती आपण बनवावे असे सर्वच मूर्तीकारांचे स्वप्न असते़ आज हे स्वप्न माझे पूर्ण झाले आहे़ ही मूर्ती बनवण्यासाठी आम्हाला तीन महिने लागले़ ही मूर्ती शनिवारी सायंकाळी शहापूरकडे रवाना झाल्याचे शिल्पकार नितीन जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मध्यप्रदेशात मूर्तीची प्रतिष्ठापना ही सोलापूरकरांना अभिमान वाटावी, अशीच आहे. 

Web Title: Equestrian Shiva idol installed in Solapur in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.