शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

Sting Operation; सोलापूर शहरातील कंटेन्मेंट झोन म्हणजे ‘आव जाव घर तुम्हारा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 10:57 AM

ना पोलीस बंदोबस्त ना आरोग्य कर्मचाºयांची व्यवस्था; नागरिक खुलेआम फिरत असल्याचा धक्कादायक वास्तव्य

ठळक मुद्देमहसूल अधिकारी प्रतिबंधित क्षेत्राची हद्द ठरवितात व त्या भागात बाहेरून कोणाला येऊ दिले जात नाहीरुग्णांचा संपर्क शोधण्यासाठी व क्वारंटाईन करण्यासाठी पोलिसांची मदत आवश्यक आहेप्रतिबंधित क्षेत्राला दोन किंवा एकच प्रवेशद्वार ठेवून बाकीचा भाग व रस्ते बांबू किंवा इतर साहित्यांचा वापर

सोलापूर : शहरातील बहुतांश कंटेन्मेंट एरियात आज फेरफटका मारला असता कंटेन्मेंट एरियाची ऐशी की तैशी झाल्याचे जाणवले. कंटेन्मेंट एरियात ना पोलीस बंदोबस्त होता, ना आरोग्य कर्मचाºयांची वर्दळ. कोरोना रुग्ण आढळल्यानंतर त्या घरातील नागरिकांना एक तर होम क्वारंटाईन करतात किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करतात. संबंधित रुग्णाच्या घराला सील करतात. घर परिसरात कोणी येऊ नये यासाठी बांबू बांधून ठेवतात. एकदा हे काम झाले की त्या कंटेन्मेंट एरियाकडे ना पोलीस फिरकतात, ना आरोग्य कर्मचारी. मग तो कंटेन्मेंट परिसर म्हणजे ‘आवो जावो घर तुम्हारा’ असे होऊन जाते. कंटेन्मेंट एरियाबद्दल प्रशासन खूपच उदासीन आहे. याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रे निश्चित केलेली आहेत. एखाद्या गल्लीतील एखाद्या घरात जण कोणी कोरोना पॉझिटिव्ह झाला तर त्या घरावर प्रतिबंधित म्हणून फलक लावला जातो; पण त्या परिसरात जास्त रूग्ण असतील तर तो संपूर्ण परिसर कंटेन्टमेंट घोषित केला जातो.

जोडभावी पेठेत राजरोस वारसहा दिवसांपूर्वी जोडभावी पेठ परिसरातील व्यापारी बँक भागात तीन लोक बाधित निघाले. शिवाय जवळपास ३० लोक हे क्वारंटाईन आहेत. या भागातील स्टील कपाट बनवण्याची दुकाने ते इतर प्रकारची पाच-सात दुकाने ही चालूच आहेत. या कंटेन्मेंट झोनमधून बरेच लोक भाजीपाला, फळे, दूध अन् औषधे आणायला बाहेर पडताहेत.  या झोनमध्ये लहान मुलांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. मैदान नसल्याने ही मुले अंतर्गत रस्त्यावर खेळ खेळतात, तेही मास्क न घालताच. इतकेच नव्हे तर बाहेर थांबलेल्या रिक्षातून झोनमधील लोक खरेदीसाठी बाजारपेठेत जातात. बाजार फि रून झाल्यानंतर झोनमध्ये परतात. या मुक्तसंचारातून एकमेकांचा सरळ संपर्क वाढत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन नावालाच राहिल्याची ओरड परिसरातील नागरिकांतून होत आहे.

  • - पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या ठिकाणी आरोग्य विभाग पोलीस व महसूल अधिकाºयांच्या मदतीने रुग्णांची हिस्ट्री काढून संबंधित लोकांना क्वारंटाईन केले जाते. त्याप्रमाणे महसूल अधिकारी प्रतिबंधित क्षेत्राची हद्द ठरवितात व त्या भागात बाहेरून कोणाला येऊ दिले जात नाही व आतील लोकांना बाहेर ये-जा करण्यास सक्त मनाई आहे.
  • - रुग्णांचा संपर्क शोधण्यासाठी व क्वारंटाईन करण्यासाठी पोलिसांची मदत आवश्यक आहे. यासाठी प्रतिबंधित क्षेत्राला दोन किंवा एकच प्रवेशद्वार ठेवून बाकीचा भाग व रस्ते बांबू किंवा इतर साहित्यांचा वापर करून बंद केले जातात. प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त असतो. 
  • - एखादी व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर जात असेल तर गरजेचे कारण असेल तर सोडले जाते. यामध्ये अन्न, औषध व उपचाराव्यतिरिक्त विनाकारण नागरिकांना घराबाहेर येण्यास मनाई आहे. या क्षेत्रात महसूल प्रशासनाने किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, असे नियमात आहे.

गांभीर्य कमीच..गीता नगर येथील न्यू पाच्छापेठ परिसरात एक घर बांबूंनी सील केले होते. तेथे यापूर्वी एक महिला पोलीस आणि एसआरपी पोलीस तैनात असल्याची माहिती त्या परिसरातील नागरिकांनी दिली. त्या कंटेन्मेंट परिसरात फेरफटका मारल्यानंतर पाचशे ते सहाशे मीटरपर्यंत एकही पोलीस दिसला नाही. एकूणच कंटेन्टमेंट झोनसंदर्भात कोणतेच गांभीर्य दिसून आले नाही.

बुधले गल्लीत राजरोस वावर

  • - कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बुधले गल्ली येथील एक भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. याठिकाणी समोरून रस्ता बंद करण्यात आला असला तरी पाठीमागील बाजूने लोकांची ये-जा असते. बंदोबस्तासाठी असलेले पोलीस काही वेळेसाठी इतरत्र गेले की मग बाहेरील लोकांना आतमध्ये जाण्यास मार्ग मोकळा होत असतो. 
  • - दोन महिन्यांपूर्वी मराठा वस्ती शिवगंगा मंदिर परिसरात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे तो भाग पोलिसांनी सील केला होता. एक महिन्याच्या कालावधीनंतर तेथील सील काढण्यात आले, मात्र याच परिसरात असलेल्या बुधले गल्लीमध्ये एक रुग्ण आढळून आला. या भागात जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे.
टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या