इंजिनमध्ये बिघाड, पुणे सोलापूर इंद्रायणीला दोन तास उशीर 

By रूपेश हेळवे | Updated: December 2, 2023 15:19 IST2023-12-02T15:19:19+5:302023-12-02T15:19:42+5:30

विभागातील गाड्यांना उशीर लागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत.

Engine failure Pune Solapur Indrayani railway train two hours late | इंजिनमध्ये बिघाड, पुणे सोलापूर इंद्रायणीला दोन तास उशीर 

इंजिनमध्ये बिघाड, पुणे सोलापूर इंद्रायणीला दोन तास उशीर 

सोलापूर : विभागातील गाड्यांना उशीर लागण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. शनिवारीही पुण्याहून सोलापूरला येणाऱ्या रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ती गाडी वेळेवर धावली नाही. यामुळे याचा फटका दुपारी साेलापुरातून पुण्याला निघणाऱ्या इंद्रायणीला बसला आणि ती जवळपास दोन तास उशीराने धावत आहे.

सुट्टीच्या वेळेत आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा बेत केलेल्या सोलापुरकरांच्या स्वप्नावर रेल्वेमुळे पाणी पडले. शनिवारी सकाळी नऊ वाजता निघणारी पुणे येथून सोलापूरला गाडी तेथून अर्धा तास उशीरा निघाली. इंजिनमध्ये बिगाड झाल्याने जिंती रोडवर जवळपास दीड तास गाडी तेथेच थांबली. यामुळे प्रवाशांचा सुट्टीचा प्लॅन विस्कटला असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. अशा घटना वारंवार होत असल्याने लोकप्रतिनिधी यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी ही प्रवाशांकडून केली जात आहे.

Web Title: Engine failure Pune Solapur Indrayani railway train two hours late