शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

डिसेंबर २०१८अखेरपर्यंत राज्यात १०० टक्के विद्युतीकरण,वीजपुरवठा नसलेल्या नागरिकांनी सौभाग्य योजनेचा लाभ घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 16:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना सौभाग्य या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ २५ सप्टेंबर २०१७ रोजी केला.  या योजनेंतर्गत महावितरणच्या वतीने ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देऊन राज्यात १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे

ठळक मुद्देराज्यात प्रत्येक घरात वीज पोहचावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे सातत्याने प्रयत्नशील पंडित दिनदयाल ग्राम ज्योती योजनेंतर्गत राज्यातील ३ लाख ९६ हजार १९६ घरांना वीजजोडण्या देण्याचे काम सुरूसौभाग्य योजनेंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ११ लाख ६४ हजार १३५ लाभाथ्यार्ना वीजपुरवठा देण्याचे उद्दिष्ट

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना सौभाग्य या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ २५ सप्टेंबर २०१७ रोजी केला.  या योजनेंतर्गत महावितरणच्या वतीने ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देऊन राज्यात १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. राज्यात प्रत्येक घरात वीज पोहचावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे सातत्याने प्रयत्नशील असून त्यांच्या निर्देशानुसार महावितरणच्या वतीने सौभाग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.        सौभाग्य योजनेत शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीजजोडणी देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना ही वीजजोडणी विनाशुल्क देण्यात येणार असून इतर लाभार्थ्याना मात्र ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे ५०० रुपये संबंधित लाभार्थ्याने त्याच्या बिलातून १० टप्प्यात भरावयाचे आहेत. मोफत वीजजोडणीसाठी लाभार्थी कुटुंबांची पात्रता २०११ च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात येणार आहे. योजनेत वीजपुरवठा प्राप्त झालेल्या ग्राहकांना मासिक वीजबिल भरणे बंधनकारक आहे. मात्र थकबाकीमुळे कायमचा वीजपुरवठा खंडित झालेले घरे, तात्पुरत्या शिबिरामधील स्थलांतरित होऊ शकणारी घरे तसेच शेतांमधील घरे या योजनेस पात्र ठरणार नाहीत.या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्याना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चाजिंग पॉइंट, एक एलईडी दिवा मोफत देण्यात येणार आहे. तसेच अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी पारंपरिक विद्युतीकरण करणे शक्य नाही अशा घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा देण्यात येणार आहे. या ठिकाणी अंतर्गत वायरिंगसह एक डी.सी. पंखा, पाच एलईडी दिवे आणि एक डी.सी.  चार्जिंग पॉइंट मोफत देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदीम योजना व इतर योजनेतून तयार झालेल्या घरांनाही मोफत वीजपुरवठा देण्यात येणार आहे.सौभाग्य योजनेंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ११ लाख ६४ हजार १३५ लाभाथ्यार्ना वीजपुरवठा देण्याचे उद्दिष्ट असून,  यापैकी ७ लाख ६७ हजार ९३९ लाभार्थ्याना पारंपरिक पद्धतीने तर २१ हजार ५६ लाभार्थ्याना अपारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच दारिर्द्यरेषेखालील घरे व सौभाग्य योजनेत पात्र घरांना पूर्वी मंजूर झालेल्या पंडित दिनदयाल ग्राम ज्योती योजनेंतर्गत राज्यातील ३ लाख ९६ हजार १९६ घरांना वीजजोडण्या देण्याचे काम सुरू आहे.

      राज्यात वीजपुरवठा नसलेल्या नागरिकांनी सौभाग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या जवळच्या कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा किंवा 1800-200-3435 अथवा 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

 

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरण